traveling car burned down incident in poladpur kokan marathi news 
कोकण

'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ; वाचले 'हे' प्रवासी...

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर / कणकवली (सिंधुदूर्ग) :  कणकवली येथून मुंबईकडे निघालेल्या खासगी आराम बसने आज पहाटे पेट घेतला. पोलादपूर चरई फाटा दरम्यान गाडीचे मागील टायर गरम होऊन पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळाली. यामध्ये सुदैवाने गाडीत प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप असलेची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

गाडीचे टायर गरम झाले अन्
खासगी आराम बस (एमएच. ४ एफके ०००९) ही पहाटे दोनच्या सुमारास पोलादपूर तालुक्‍याच्या हद्दीत आली असताना गाडीचे टायर गरम झाले असल्याचा वास काही काळापासून येत होता. लोहार माळ जवळ येताच या टायरने अचानक पेट घेतला. संबंधित आगीचे वृत्त समजताच महाड औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला; मात्र बस जळून खाक झाली.

४८ प्रवासी सुखरूप

चालक विद्यानंद किलोस्कर (वय ३८) यांच्यासह गाडीतील सर्व ४८ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमनदलाच्या जवानांकडून प्राप्त झाली.
बसला लागलेल्या आगीमुळे काही मीटरवर आगीचे लोट दिसून येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तो पर्यंत बस खाक झाली. याबाबत अधिक तपास सपोनी प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जी. पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT