The treatment for AIDS patients in Dhirubhai Ambani Hospital has stopped 
कोकण

धीरूभाई अंबानी रुग्णालयातील एड्स रुग्णांना उपचार बंद!

संतोष पेरणे

नेरळ (जिल्हा रायगड) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने राज्य सरकारने मुंबई, पुणे भागातील एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊ पणा जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेकांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपलोकायुक्त, तसेच एड्स निर्मूलन कार्यक्रमाचे सहआयुक्त यांनी रुग्णालयाला भेटी देऊन रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, जगातील आरोग्य विभागाच्या एड्स निर्मूलन कार्यक्रम अधिकारी यांनी देखील बंद पडलेल्या केंद्राबाबत गंभीर दखल घेतल्याने अंबानी रुग्णालयावर राज्य सरकारचा सुरू असलेला आशीर्वाद दूर होतो का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
 
मुंबई आणि पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने राज्य सरकारने लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालयाला एड्स रुग्णांचे निर्मूलन केंद्र निवडले. शेकडो रुग्णांना औषधे आणि त्यांच्यावर उपाचार केले जाणारे अंबानी रुग्णालयात मागील काही वर्षे तज्ञ डॉक्टरांची कमतरता असून कर्मचारी वर्ग देखील प्रशिक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. एड्स निर्मूलन कार्यक्रमाचे प्रमुख पद सध्या तेथे एका बालरोग तज्ञ असलेल्या महिला डॉक्टर प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एड्स निर्मूलनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण एकदाही घेतले नाही. त्याचवेळी तेथील नर्स आणि रेडिओलॉजिस्ट हे जेमतेम 12 पास शिक्षण घेतलेले असून एड्स रुग्णांसाठी महत्वाची भूमिका बजावणारे समुपदेशक हे पद अनेक वर्षे रिक्त आहे. त्याचवेळी या रुग्णलयात एड्स रुग्णांसाठी औषधे देणारे फार्मासिस्ट हे पद रिक्त असल्याने एड्स रुग्णांवर आणखी कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

एड्स हा आजार बाधित रुग्ण सातत्याने आपला आजार समाजापासून लपविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अंबानी रुग्णालयातील अन्य सर्व विभाग बहुतेक बंद असल्याने रुग्णालयात येणारे रुग्ण हे एड्सचे असल्याची कुजबुज वाढू लागल्याने एड्सग्रस्त रुग्णांना हे रुग्णालय आता धोकादायक वाटू लागले आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे रुग्णालयात प्रशिक्षित स्टाफ नसल्याने आणि प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने एड्स रुग्णांना आता टीबीने ग्रासले असून त्यात त्यांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली असून उपचार वेळेवर आणि अचूक निदान होणार नसेल तर जायचे कशाला? असा मतप्रवाह शेकडो एड्स रुग्णांत निर्माण झाला आहे.

एड्सच्या शेकडो नोंदणीकृत रुग्णांना औषधे द्यायला कोणी फार्मासिस्ट नाही, ओषधांचा साठा कमी आहे असे असताना देखील दरवर्षी रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मात्र आपला करोडो रुपयांचा सीएसआर फंड खर्च करीत असल्याचे कंपनी आपल्या वार्षिक अहवालात जाहीर करीत आहे. यामुळे हा भ्रष्टाचाराबाबत याठिकाणी रुग्णालय मेडिकल संचालक असलेले डॉ संजय ठाकूर यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून एड्स रुग्णांची होणारी हेळसांड बाबत आवाज उठविला होता. त्यामुळे डॉ. ठाकूर यांची रुग्णालय प्रशासनाने बदली केली होती.

मात्र लोकांचा लोकाश्रय मिळवणारे डॉ ठाकूर यांनी नोकरी सोडल्याने तर धीरूभाई अंबानी रुग्णालय आणखी डबघाईला आले असून रुग्ण त्याठिकाणी फिरकत नाहीत.सततच्या तक्रारनंतर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे प्रकल्प सहसंचालक डॉ. प्रमोद देवराज यांनी आपल्या विभागाकडे आलेल्या असंख्य तक्रारीनंतर 12 एप्रिल ला रुग्णालयात येऊन पाहणी केली. त्यावेळी एड्स निर्मूलन विभागाचे रायगड जिल्ह्याचे समन्वयक माने हे देखील सोबत होते. ही समिती आपला अहवाल राज्य एड्स निर्मूलन विभागाचे प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी,कडक समजले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना देणार आहेत. त्याचवेळी या रुग्णालयाबाबत तत्कालीन मेडिकल संचालक डॉ. संजय ठाकूर यांच्या अहवालाची गंभीर दखल जागतिक आरोग्य विभाग आणि वर्ल्ड युनोस्को चे समन्वयक प्रमुख डॉ. बिल्लाई कमेरा यांनी घेतली आहे.एड्स निर्मूलनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात असताना मुंबई आणि पुणे या महानगराच्या 200 किलोमीटर परिसरात असलेल्या रुग्णांवर उपचार होणाऱ्या केंद्रावर उपचार होत नसल्याने जागतिक पातळीवर देखील एड्स निर्मूलनाबाबत ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एड्स रुग्णांना सेवा मिळत नसल्याने धीरूभाई अंबानी रुग्णालयावर शासनाला कारवाई करावी लागणार आहे.

हे रुग्णालय खासगी असले तरी राज्य सरकारच्या अखत्यारीत असून त्यावर शासनाचे नियंत्रण आहे.त्यामुळे सुरू असलेल्या कारभाराबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी माहिती कळवीत असतो. - अजित गवळी, जिल्हा शक्य चिकीत्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT