Treatment thirteen hours after the bite in ratnagiri 
कोकण

सर्पदंश झाल्यापासून महिलेवर तब्बल तेरा तासानंतर उपचार

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - तालुक्‍यातील अणसुरे येथील संर्पदश झालेल्या महिलेवर जैतापूर-राजापूर-रत्नागिरी-डेरवण असा प्रवास केल्यानंतर तब्बल सुमारे तेरा तासानंतर उपचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सुदैवाने ती महिला बरी झाली आहे. मात्र आरोग्य विभागाचा कारभार आणि त्या ठिकाणच्या उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत लोकांमधून साशंकता आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने भातकापणीच्या कामांना सुरवात झाली आहे. या कालावधीत लोकांना संर्पदंश, विंचूदंश यांचा सामना करावा लागत आहे. अशातच अणसुरे येथील एका महिलेला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी घडली.

तिच्या नातेवाइकांनी त्या महिलेला तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथून त्या महिलेला राजापूरला हलविण्यात आले. राजापूरहून रत्नागिरी आणि त्यानंतर तिला डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यामध्ये तब्बल सुमारे तेरा तासांचा प्रवास घडला. या प्रवासानंतर तिच्यावर उपचार झाले. सुदैवाने ती महिला सुखरूप आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिंदेंच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेटी टांगती तलवार, निवडणूक शपथपत्रात दिली खोटी माहिती

NEET Paper leak Case: नीट पेपरफुटीप्रकरणी महिलेला अटक; बिबवेवाडीतील मनिषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात; विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविल्याचा संशय!

बाबो...! सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे बिजनेसवुमन, स्वत:चा व्हिला आणि बरंच काही

Public Wifi Risk : पब्लिक Wi-Fi वर चुकूनही करू नका 'ही' 3 कामे, नाहीतर काही सेकंदांत होईल अकाऊंट बँक रिकामं, मोबाईल हॅक

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षा वाद पेटला! NTA मुख्यालयासमोर ABVPचं जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT