कोकण

शास्त्रीनदीत कोसळलेला ट्रक काढला बाहेर; चालक मात्र बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला होता. 

काल रात्री 10 च्या सुमारास मुंबईकडून गोव्याकडे जाणारा एक ट्रक नदीत कोसळताना ग्रामस्थांसह वाहनचालकांनी पाहिला. त्यानंतर एकच कल्लोळ झाला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्‍वर पोलिसांसह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळावर दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी उलट बाजुने नदीपात्रात जावून ट्रकमध्ये माणसे आहेत का याची चाचपणी केली. मात्र पुढचा भाग पुर्णतः पाण्यात असल्याने कशाचाही अंदाज आला नाही. घटनेची माहिती मिळताच राजु काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी देवरूखचे जयवंत वाईकर, अण्णा बेर्डे, सिध्दु वेल्हाळ, विशाल तळेकर, दिपक गेल्ये, दिलीप गुरव, बाळू आंबवकर, राजु वणकुद्रे, विनायक लिंबुकर आदी सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस निरीक्षक उदय झावरे, वाहतूक पोलिस झापडेकर आदींसह कर्मचारी आणि काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. ट्रकमधील कुणाचाही शोध लागला नाही. रात्री एका क्रेनच्या सहाय्याने कंटेनर काढण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याला यश आले नाही.

सकाळी अकरा वाजता दुसरी क्रेन मागवुन शास्त्रीपुलावर रस्ता बंद करून अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनर रस्त्यावर  आणण्यात यश आले. अर्ध्या तासात मुंबई - गोवा महामार्गावर ठप्पा झाल्याने दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.

या ट्रकमध्ये चालक आणि क्लिनर हे दोघेच होते कि लांब पल्ल्याची वाहतूक असल्याने अन्य एक जादा चालक पण होता याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. या ट्रकच्या मालकाला बोलावून घेण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: बुमराहने दिला हैदराबादला पहिला धक्का! युवा सलामीवीर स्वस्तात बाद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT