Twelfth examination conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education result 
कोकण

कोकणची पोरं हुशारच ; सलग नवव्या वर्षी अव्वल स्थानी...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा  नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 95.89 टक्के आणि पुनर्परीक्षार्थींचा निकाल 41.83 टक्के लागला. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 2.66 टक्के निकालात वाढ झाली आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यंदा कोरोना महामारीमुळे निकाल लावण्यास सुमारे महिन्याभराचा उशीर झाला.


यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. परंतु कोरोना संकटामुळे पेपर तपासणीस विलंब झाला. तसेच कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने निकाल जाहीर करण्यासाठीची कोकण मंडळाची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. परंतु निवेदनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात 153 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 91 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले. यासाठी अनुक्रमे 37 व 23 अशी एकूण 60 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली.
दरवर्षीप्रमाणे कोकण मंडळात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यंदा मुलांचे प्रमाण 92.40 टक्के व मुलींचे प्रमाण 97.20 टक्के म्हणजे एकूण 4.8 टक्के जास्त आहे.

यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गैरमार्ग प्रकरण आढळले नाही, ही आनंदाची गोष्ट असल्याचे मंडळाने जाहीर केले. विज्ञान शाखेचा निकाल 98.57 टक्के, कला साखा 90.8, वाणिज्य 97.89 आणि व्यावसायिक विषयांचा निकाल 95.29 टक्के लागला. गुणपडताळणीसाठी 17 जुलै ते 27 जुलै, छायाप्रतीसाठी 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. तसेच त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल. 

जिल्हा बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी या क्रमाने
रत्नागिरी 19607, 18728, 95.52
सिंधुदुर्ग 10536, 10175, 96.57

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT