NCP-BJP-Shivsena
NCP-BJP-Shivsena google
कोकण

शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी; सेनेतील बंडखोर माजी आमदारांची हातमिळवणी

सिद्धेश परशेट्ये

स्थानिक पातळीवरील सेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आघाडीबाबत अद्यापही संभ्रमात

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये सेना, राष्ट्रवादीची झालेली कथित आघाडी ही सेनेतीलच बंडखोरांनी केलेली हातमिळवणी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवरील सेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आघाडीबाबत अद्यापही संभ्रमात असून गेली काही वर्ष पक्षविरोधात काम केलेल्यांसोबत नगरपंचायत निवडणुकीमध्ये सक्रिय काम करण्यास हे पदाधिकारी तयार नाहीत.

दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये दापोली मंडणगड या दोन ठिकाणी नगरपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये सेना विरुद्ध राष्ट्रवादी, अशी लढत होईल, अस वाटत असताना शिवसेनेतील बंडखोर अशी ओळख मिळवलेले माजी आमदार संजय कदम व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी हातमिळवणी करत राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी झाल्याचे जाहीर केले. दळवी यांच्या विरोधामध्ये सेनेमधून बंड करून संजय कदम यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. याचे प्रमुख कारण जिल्हापरिषद अध्यक्षपदावरून दोघांत झालेला टोकाचा संघर्ष होते.

संजय कदम यांनी त्यावेळी बंडखोरी केली. या निवडणुकीत दळवी यांचा नाकर्तेपणा संजय कदम यांनी ओरडून-ओरडून जनतेसमोर सांगितला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दळवी पराभूत झाले. दळवी यांनी स्वपक्षीय नेते आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचा आरोप करीत शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. दळवी या काळात संजय कदमना रोखण्याऐवजी शिवसेनेतील नेत्यांवर तोंडसुख घेत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दळवी यांनी, योगेश कदम यांच्या अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

सेनेचे अस्तित्व पणास लावणार...

दरम्यान, संजय कदम हे राष्ट्रवादीत स्थिरावले. दळवी हे कधी भाजपाच्या नेत्यांसोबत तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसत होते. राज्य पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी झाल्यावर देखील कदम यांनी त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल केलेला आढळून आला नाही. परंतु राज्यपातळीवर झालेल्या आघाडीमूळे कदम यांना नवसंजीवनी मिळाली, यात शंका नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष बंडाच्या पवित्र्यात असलेले दळवी आणि दापोली विधानसभा मतदार संघात सेना औषधाला सुद्धा ठेवायची नाही, असा आत्मविश्वास बाळगून काम करणारे माजी आमदार संजय कदम असे दोघे मिळून मतदारसंघातील सेनेचे अस्तित्व पणास लावणार अशी चर्चा सुरू आहे.

जुना व्हीडीओ व्हायरल

नेहमीच सेनेच्या विरोधात गरळ ओकणारे भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या व्यासपीठावर बसून त्यांना प्रोत्साहन देणारे सूर्यकांत दळवी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे दळवींची पक्षप्रमुख आणि पक्षाबद्दलची निष्ठा किती ? याविषयी चर्चा सुरू आहेत.

"सूर्यकांत दळवी यांची मतदारसंघातील ताकद किती, पत काय हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहित आहे. गेल्या सात वर्षात कधी राष्ट्रवादीच्या आडोशाला तर कधी भाजपच्या दारात उभे राहणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे."

- भगवान घाडगे, माजी समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT