Two Groups Fight In Premises Of Amboli Talathi Office 
कोकण

आंबोली तलाठी कार्यालयाच्या आवारात दोन गटात मारामारी 

सकाळवृत्तसेवा

आंबोली ( सिंधुदुर्ग ) - येथील बाजारवाडीतील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांनी जमिनीच्या विक्री प्रकरणाशी संबंधित दाव्याची सुनावणी आज ठेवली होती. यावेळी तक्रारदार आणि प्रतिवादी यांच्यात मारामारी झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली कामतवाडी येथील एका जमिनी संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी सुनावणी ठेवली होती. त्यावेळी सुनावणी दरम्यान तलाठी कार्यालय आवारात मारामारी झाली. यावेळी घटनास्थळी पोलिस दाखल झाले. हवालदार दत्ता देसाई, सुनील भोगण, तसेच आंबोली बिटच्या पोलीसांचा समावेश होता. यात तक्रारदार  यशवंत नाटलेकर यांनी कामतवाडी येथील लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि शिवीगाळ केली असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अर्जुन गावडे, विलास गावडे, कैलास गावडे, विश्राम गावडे यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

गणपत पाटील हे आंबोलीत आरोग्य केंद्रात दाखल असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 20 ते 25 जणांनी जमाव करून बेदम मारहाण केली आणि आपल्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन लांबवली. खिशातील 9 हजार 130 रुपये गायब असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उशिरापर्यंत गणपत पाटील यांची तक्रार घेण्याचे पोलिसांचे काम सुरू होते. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Job Vacancy 2026: बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती; 1,146 जागांवर होणार नियुक्ती, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Nashik Crime : बसस्थानकांवरील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी 'लेडी चोर' जेरबंद; सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग

चित्रपट बंद पाडण्याचे खूप प्रयत्न... 'रणपती शिवराय स्वारी आग्रा'बद्दल बोलताना अजय पुरकर संतापले; आव्हान देत म्हणाले- अजूनही...

Dhule Municipal Election : धुळे मनपा प्रभाग २ मध्ये 'काँटे की टक्कर'; प्रस्थापितांच्या अनुभवाचा कस, तर नवोदितांचे तगडे आव्हान

Junnar Crime : निमगिरी आदिवासी भागातील हत्याकांड: आरोपी फरार; पोलिसांची मोठी मोहीम सुरु!

SCROLL FOR NEXT