Two trains will run on Konkan railway line 
कोकण

 कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.


कोकण रेल्वेच्या मार्गावर 26 सप्टेंबरपासून तुतारी तर 2 ऑक्टोबर पासून राजधानी या दोन गाड्या धावणार आहेत. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासून मगच ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला ट्रेन ने प्रवास करता येणार नाही.

प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशांमा किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे. त्याच बरोबर स्थानाक परिसरात वावरताना प्रवाशांनी परस्परात सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे. आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सूचना महत्वाची आहे. तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांना ट्रेन मध्ये प्रवेश मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पाऊले  कोकण रेल्वे कडून उचलली जात आहेत. यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या  निर्धारित वेळेच्या आधी  किमान एक तास रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT