Two women in Mahad seized the opportunity to start a small industry  sakal
कोकण

Raigad News : नवदुर्गांची व्यवसायात उतुंग भरारी; विकसित केला 'ॲलोर्वेदा ब्रँड'

Raigad News : कोरोना संकटकाळात अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला आले. मात्र या संकटकाळात संधी शोधून महाड येथील दोन महिलांनी लघुउद्योग सुरु केला.

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली: कोरोना संकटकाळात अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला आले. मात्र या संकटकाळात संधी शोधून महाड येथील दोन महिलांनी लघुउद्योग सुरु केला. आणि बघताबघता साबण, जेल व क्रीम चा ॲलोर्वेदा ब्रँड विकसित केला आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत.

महाड येथील पूजा त्रियुग खेडेकर व त्यांची मैत्रीण सुप्रिया स्वप्नील स्वामी यांनी कोणताही व्यवसायिक अनुभव व पार्श्वभूमी नसताना अनेक अडचणीवर मात करत स्वतःचा एक ब्रँड उभा करून मोठी झेप व उभारी घेतली आहे. सुरवातीला 4 ते 5 प्रॉडक्ट होते. आता 55 प्रकारचे आहेत. ज्यामध्ये 14 प्रकारचे साबण आहेत. ग्राहकांच्या मागणी नुसार प्रॉडक्ट बनवून दिला जातो.

त्यांच्या या कार्याबद्दल दोघींनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. व्यवसायाच्या वर्षपूर्ती ला युनाइटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (UMICC) च्या वतीने सन्मानित करण्यात आले. पूजा खेडेकर यांना शुक्रवारी (ता. 4) महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून उत्कृष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला. याआधी देखील दोघींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

पूजा खेडेकर यांनी सांगितले की त्या महाड मध्ये जुनियर कॉलेज ला इंग्लीश विषय शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या की या व्यवसायात येणे हे काहीच योजलेले नसताना सुद्धा अनपेक्षित प्रवेश झाला. यांचे कारण लॉकडाऊन मध्ये स्वतःला व स्वतःच्या विचारांना वाव देण्याची संधी मिळाली. त्यातच माझी मैत्रीण सुप्रिया व तिचे पती स्वप्नील स्वामी यांच्याशी भेटणं बोलणं व्हायचं, असंच एक दिवस पुढे काय काय करायचे, काय आपले ध्येय असावे या विषयावर बोलत असताना स्वप्नील जे स्वदेस फाउंडेशन मध्ये कृषी तज्ञ आहेत त्यांनी कोरफडी पासून जेल बनवणे ही संकल्पना मांडली.

या संकल्पने मागील त्याचा उद्देश हा लोकांचा कोरोना काळात सेंद्रिय वस्तूकडे वाढलेला कल हा होता. त्या नंतर मी व सुप्रिया दोघीनी याच्याकडे संधी म्हणून पाहायचं ठरवलं आणि भागीदारी मध्ये या व्यवसाय सुरवात करायचे ठरवले.

युट्युब व सोशल मिडीयाची मदत

कोणताही व्यवसाय म्हंटले तर अनुभव महत्वाचा असतो पण या व्यवसाय क्षेत्रात आम्हा दोघी पैकी कोणाचे घरातील नसल्याने सर्व सुरवात नव्याने करणे होते. कोरोनाकाळ असल्याने कुठे बाहेर जाऊन या बाबत मार्गदर्शन व एखादा कोर्स करणे शक्य नव्हत अशा वेळी सोशल मीडीया चा वापर करून व यूटूब वरील व्हीडिओ पाहून जेल ची बॅच करण्यास सुरवात केली. प्रत्येक बॅच चे आठवडा आठवडा निरीक्षण करून लक्षात आले की फक्त वीडियो पाहून तसं करून काही होणार नाही. आपल्याला प्रत्येक्ष पुणे किंवा मुंबई ला जाऊन शिकणे गरजेचे आहे. मग काही काळानंतर आम्ही पुणे येथे कोर्स करून आलो.

'ॲलोर्वेदा ब्रँड' तयार

19 फेब्रु 2021 ला शिवजयंती चा मुहूर्त साधत व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आपल्या उत्पादनाला योग्य नावासाठी ॲलोर्वेदा हे नाव आयुर्वेद आणि ॲलोवेरा यांचा मिलाप करून ठेवण्यात आले.

घरातून सुरुवात

पहिले हा व्यवसाय पूजा खेडेकर यांच्या घरातून चालू केला. सोशियल मीडीयाचा वापर करून जाहिरात केली. ग्राहक मिळवले व ते टिकवले. त्यांच्या मार्फत नवीन ग्राहक मिळवले आणि मिळत आहेत. काही वेळा लोंकाना घरी जाऊन प्रॉडक्ट देणे ही केले. शाळा महाविद्यालय यांना भेटी देऊन हर्बल प्रॉडक्ट बद्दल मार्गदर्शकन केले. सर्व प्रॉडक्ट सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा माफक दरात ठेवले आहेत.

अडचणींवर मात

या सर्व गोष्टी करताना खूप अडचणी आल्या, त्यातील पहिली अडचण व्यवसायामधील नसलेला अनुभव. नवीन व्यवसाय महाड सारख्या शहरात सुरू करताना आर्थिक पाठबळ असणे ही आवश्यक होते. पण या साठी लागणारी मदत घरातूनच झाली. नवीन ग्राहक मिळवणे जसे कठीण होते तसेच आवश्यक कच्चा माल पुरवठा करणारे शोधणे ही समस्या ही होती. या सर्व प्रोसेस मध्ये घरातल्या लोकांप्रमाणेच मित्रपरिवाराकडून ही सहकार्य मिळाले.

जम बसत असतांनाच सगळ्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो तो म्हणजे महाड मध्ये 22 जुलै 2021 चा आलेला महापूर, या मुळे घरात असलेला कच्चा माल व तयार प्रॉडक्ट सर्व पुरात वाहून गेल्याने खूप आर्थिक व मानसिक नुकसान झाले. पण त्यातून लगेच बाहेर येऊन पुढील गोष्टी वर लक्ष केंद्रित करायचं दोघींनी ठरवल. त्या मध्ये पहिलं ध्येय स्वतःच शॉप असणं हे होत. आणि या ध्येयाचा पाठलाग 5 डिसेंबर 2021 ला संपला. आता शॉप ला 3 वर्षे झाली असून व्यवसाय सुरळीत चालू आहे. येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणी पार करायला स्व अनुभव पाठीशी आहे. सध्याच्या घडीला मासिक उत्पन्न 70 ते 90 हजार आहे.

ॲलोर्वेदा हा ब्रांड जागतिक स्थरावर पोहोचवायचा आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांची विश्वासार्ह्यता सुद्धा अशीच टिकवून ठेवायची आहे. या व्यवसाय सुरु करण्यासाठी आम्हा दोघींना आमचे पती व घरातील सदस्य (सासू व सासरे ) यांचा मिळालेला भक्कम पाठिंबा व सहकार्य खूप मोलाचं होत. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आम्ही ही उंच भरारी घेण्यास सक्षम झालो.

पूजा खेडेकर व सुप्रिया स्वामी, उद्योजिका

मागील तीन वर्षांपासून ॲलोर्वेदा चे विविध प्रॉडक्ट वापरत आहे. हे सर्व प्रोडक्ट अतिशय माफक दरात दर्जेदार आणि खात्रीशीर आहेत. खूप चांगला प्रभाव देखील आहे.

आशिष दातखिळे, ग्राहक मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT