uday samant press conference konkan sindhudurg
uday samant press conference konkan sindhudurg 
कोकण

राणेंच्या मेडिकलबाबत उदय सामंत म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - नारायण राणेंच्या पडवे मेडिकलमध्ये क्‍लिनिक आहे. तिथे कोविड 19 तपासणीची लॅब अथवा इतर यंत्रणा नाही. त्यामुळे तिथे स्वॅब नमुने टेस्ट करण्याचा विषयच येत नाही, असा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केला. कोरोना प्रादुर्भाव काळातही आंदोलने करून भाजपची नेतेमंडळी घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
श्री. सामंत यांनी येथील विजयभवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक यांच्यासह सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, सुशांत नाईक, शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे आदी उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, ""राणेंच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड 19 टेस्टच्या मुद्द्यावर सध्या राजकारण सुरू आहे. मात्र, अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या टीमने या मेडिकल कॉलेजची नुकतीच पाहणी केली. या वेळी कोविड 19 स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी लागणारे आरटीपीसीआर हे मशीन आणि त्याअनुषंगाने लागणारे साहित्यच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

याशिवाय लॅब सुरू करण्याच्या अनुषंगाने इतरही त्रुटी आढळल्या. त्या सर्व बाबींचा विचार करता राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोविड 19 स्वॅब नमुने तपासताच येत नाहीत. कोरोना रुग्णांसाठी पडवे मेडिकल कॉलेजमधील काही खाटा उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही काही नेतेमंडळींकडून दिली होती. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने या मेडिकल कॉलेजशी संपर्क देखील साधला. त्यावेळी या खाटा पेड स्वरूपात दिल्या जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. हे दर परवडणारे नसल्याने क्‍वारंटाईनसाठी या मेडिकल कॉलेजचा विचार जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने केलेला नाही.'' 
 

..तर भाजप नेत्यांना 
वेशीवरच अडवले असते 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण व इतर काही मंडळी मुंबईतील रेड झोन, कंटेन्मेंट झोनमधून रत्नागिरी-सिंधुदुर्गात आली आहेत. मला राजकारण करायचं असतं, तर त्यांना सिंधुदुर्गच्या वेशीवरच अडवून क्वारंटाईन करता आले असते; पण आम्ही चुकीचे राजकारण करत नाही. याउलट भाजपची नेतेमंडळी सिंधुदुर्गात येऊन फसवी आणि खोटी माहिती सिंधुदुर्गवासीयांना देत असल्याचाही आरोप श्री. सामंत यांनी केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT