uday samant press conference in ratnagir kokan marathi news 
कोकण

कोरोना मास्कच्या काऴ्याबाजारातून पैसे कमवणाऱ्यांना शिवसेना नेत्याचा इशारा...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना हे देशावर आलेले संकट आहे. याचा फायदा घेऊन कोणी चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गंभीरपणे दखल घेतली जाईल. तसेच महाविद्यालय, शाळा यांची स्नेहसंमेलन 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मास्कची बाजारभावापेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशाप्रकारे केवळ पैसे कमविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मास्कची विक्री होत असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात 4500 मास्कचा साठा उपलब्ध असून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

स्नेहसंमेलने 31 मार्चपर्यंत पुढे
बैठकीत त्यांनी कोरोनाबाबत योग्य ती जनजागृती करण्याच्या सूचना करून दोन्ही जिल्हा रुग्णालयात 8 बेडचा स्वतंत्र कक्ष अद्ययावत करण्याच्या सूचना आढावा बैठकीत केल्या आहेत. कोरोनाबाबत सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, राज्यात एकही रुग्ण कोरोनाचा सापडलेला नाही. असे असले तरी आपण काळजी घेतली पाहिजे. कोरोना हा आजार परदेशातून येणाऱ्या व्यक्तींमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले असल्याने दोन्ही जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या व्यक्तीची आरोग्य तपासणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

जनजागृतीची ऑडीओ क्‍लिप 
चुकीच्या पद्धतीने सर्वत्र कोरोनाबाबत माहिती पसरवली जात आहे. कोरोना हे देशावरचे संकट असून कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी आकाशवाणी, सर्व बस स्थानके, रेल्वे स्टेशन, महाविद्यालये आदी ठिकाणी कोरोनाच्या जनजागृतीची ऑडीओ क्‍लिप ऐकवली जाईल. गर्दी टाळण्यासाठी मोठ्या महाविद्यालयांचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 हेही वाचा-  यंदा या फळांमध्ये होणार मोठी घट.... ​
बुलेटीनद्वारे माहिती 
यापुढे कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात मेडिकल बुलेटीन दिले जाईल. दर दोन दिवसांनी जिल्हा शल्यचिकित्सक हे मेडिकल बुलेटीन देतील. दर आठ दिवसांनी जिल्हाधिकारी मेडिकल बुलेटीनसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा देतील, अशी माहिती सामंत यांनी दिली. 

परदेशी जहाजांची कसून तपासणी 
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांवर परदेशी मालवाहू जहाजे येतात. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या जहाजावरील कर्मचाऱ्यांची काटेकोरपणे आरोग्य तपासणी झालीच पाहिजे. यात जराही चालढकल झाली आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास कारवाई अटळ असल्याचे सांगत, ही कोणा एकाची जबाबदारी नाही. सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.  
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT