uday samant said in press conference topic of nanar refinery in ratnagiri 
कोकण

समर्थन करतील तेथेच रिफायनरी : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रिफायनरीचे समर्थन करत असतील, त्या ठिकाणीच हा प्रकल्प होईल. हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नाणारचा विषय संपला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी नवीन जागा सुचविण्यात आल्याचे ऐकिवात नसल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, नाणारमधील रिफायनरीचा विषय संपलेला आहे. मागील सरकारने उध्दव ठाकरे यांचे ऐकून नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला. आता तेच विरोधात असून नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करत आहेत. हे पूर्णतः चुकीचे आहे. शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच ठाम होती की, आम्ही स्थानिकांसोबत राहू आणि म्हणूनच शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी राहिली. स्थानिक जनतेचा या रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. म्हणून रिफायनरी प्रकल्प रद्द झालेला आहे. आता रत्नागिरी विधानसभा मतदरासंघात जयगडला रिफायनरी येतेय किंवा रायगड जिल्ह्यात तळ्याला रिफायनरी होतेय की नाही, याबाबत अजूनही माहिती नाही. मात्र, रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या ठिकाणी रिफायनरी होऊ शकते, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रिफायनरीची जागा ठरेल, तेव्हाच यावर भाष्य करु. 

वाझे यांचा स्टेटस चिंताजनक 

मुंबईतील पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणावर मंत्री सामंत म्हणाले की, एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा, ही मागणी करणे चुकीचे आहे. सचिन वाझे यांना कुणीच पाठिशी घालत नाही. तपास सुरू असताना विरोधकांकडून निलंबनासाठी तगादा लावणे चुकीचे आहे. वाझे यांनी स्टेटसला जी पोस्ट ठेवली आहे, ती चिंताजनक आहे. या प्रकरणात गृहमंत्री नक्की लक्ष घालतील. 

साधेपणाने उत्सव साजरा होईल : सामंत 

शिमगोत्सवा संदर्भात रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याचे पालन करुन साधेपणाने उत्सव साजरे होतील, असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी व्यक्‍त केला. तसेच मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात येऊ नका, असे कोणी आवाहन केले माहिती नाही; परंतु शासनाकडून त्यांच्यासाठी नियम केले आहेत, त्याचे पालन गाव पातळीवर योग्यपणे केल जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT