Uday Samant will be touring for two days in ratnagiri 
कोकण

उदय सामंत ; 'माझे कर्तव्य म्हणून संपूर्ण यंत्रणा घेऊन मी दोन दिवस कोकणात जाणारच'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. अंशता व पूर्णतः अशा 27 हजार 782 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये शासकीय इमारतींचाही समावेश आहे.  सर्वांधिक नुकसान मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्याचे झाले आहे. या तालुक्यांचा उद्यापासून दोन दिवस मी दौरा करणार आहे.अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.


संपूर्ण यंत्रणा घेऊन जाणार असून ग्रामस्थांची खाण्याची, कपड्यांची, औषधांची आदीची व्यवस्था केली जाणार आहे. पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या ठिकाणी पोचण्यात अडथळे येत आहेत. मात्र पंचनामे पूर्ण झाल्यास पुढील 48 तासात संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहिल, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

येथीस शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, निसर्ग वादळाने किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकतीच आमची व्हीसी झाली. बाधितांना मदत करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. वादळ संपल्यानंतर दुपारी दोन वाजता आपल्या महसुल यंत्रणेने पंचनाम्यांना सुरवात केली आहे. प्राथमिकदृष्ट्या हातात पडेलल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. त्यापैकी दापोली तालुक्याचे मोठे नुसकान झाले आहे. पडझडीमध्ये  मंडणगडमध्ये 800 घर, खेड 567, गुहागर 196, चिपळुण 322, संगमेश्‍वर 48, रत्नागिरी 629, लांजा 6, राजापूर 14 अशी एकूण 27 हजार 782 घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे.

 या तिन्ही तालुक्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तेथील नागरिकांना मदत म्हणून आणि माझे कर्तव्य म्हणून उद्यापासून दोन दिवस मंडणगड, दापोली तालुक्याच्या दौर्‍यावर मी झाला आहे. संपूर्ण यंत्रणा आणि धान्य, कपडे, औषध आदी सर्व सामान बाधितांना उपलब्ध होईल, यादृष्टीने माझा हा दौरा आहे. लोकांमध्ये गैरसमज नको, कालच आम्ही जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पडझड एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे पोहचण्यास अनेक अडथळे येत आहेत. मात्र माझे कर्तव्य म्हणून संपूर्ण यंत्रणा घेऊन मी दोन दिवस जाणार आहे, असे सामंत म्हणाले.

* जिल्ह्यात वादळामध्ये 6 जखमी
* 11 जनावरांचा  मृत्यू
* 3 हजार 200 झाडे पडली
* 930 विद्युत खांब पडले
* शेतीचेही मोठे नुकसान
* 41 शासकीय इमारतींची पडझड


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT