Uddhav Thackeray_Narayan Rane 
कोकण

Uddhav Thackeray: "सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी सोपवलीए"; ठाकरेंची राणेंवर शेलक्या शब्दांत टीका

बारसूमध्ये उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर त्यांनी शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : उद्धव ठाकरे यांची महाड इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. भाजपनं सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी सोपवली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राणेंवर शेलक्या शब्दांत टीका केली. (Uddhav Thackeray Mahad Rally Big responsibility entrusted to small man criticism on Narayan Rane)

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याकडं एक आणि एकावर दोन फ्री असे काहीजण आहेत. त्याची आता एवढी पंचायत झाली की त्यांना काय सांभाळावं हे कळत नाहीए. त्यामुळं सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. पण हे रोज वाट्टेल ते बोलतात, बोलू द्या कारण याच्यावर त्यांचं पोट चालतंय. उद्धव ठाकरेंचं तुम्ही सध्या सर्वकाही काढून घेतलं तरी तुम्हाला त्याची का भीती वाटते?

उद्धव ठाकरेला संपवायचं आहे ना, संपवा. पण हे सर्वजण माझे कुटुंबीय आहेत. बारसूमध्ये उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत असं राणे सांगत आहेत. पण इथं बसलेले सर्वजण माझे नातेवाईक आहेत. मी माझ्या या नातेवाईकांसाठी लढतो आहे, पण तुम्ही उपऱ्यांसाठी लढता आहात. ज्याचं काहीही देणंघेणं नाही. तुम्ही माझा महाराष्ट्र मारता आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.

आम्ही शिवसेना सोडतोय कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व काय आहे ते तुम्ही समजून घ्या. जे मला शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी हिंदुत्व सांगितलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही. अनेकदा मला साहेबांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडणारा नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे. भाजपकडं कुठलं हिंदुत्व आहे, गोमुत्रधारी हिंदुत्व आहे त्यांचं मी हे नवं नामकरण केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT