कोकण

आचऱ्यात पकडलेला अनधिकृत ट्रॉलर पळवला 

प्रशांत हिंदळेकर


मालवण (जि. सिंधुदुर्ग) : आचरा समोरच्या समुद्रात वीस वावात शुक्रवारी (ता.2) मत्स्य व्यवसाय खात्याच्या शीतल गस्ती नौकेने पकडलेला रत्नागिरीतील अनधिकृत एलईडीचा ट्रॉलर आज येथील बंदरातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. 

एका मोठ्या राजकीय नेत्याच्या कनेक्‍शनमुळेच एलईडीचा ट्रॉलर पळवविला असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते रविकिरण तोरसकर यांनी केला आहे. ते म्हणाले, "याविरोधात सोमवारी (ता. 5) मत्स्य व्यवसाय अधिकारी, तहसीलदार, पोलिसांना जाब विचारणार आहे.'' 

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी होत असताना मत्स्य व्यवसाय खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त पारंपरिक मच्छीमारांनी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण छेडले होते. यात मत्स्य व्यवसाय खात्याने अनधिकृत एलईडीच्या ट्रॉलर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

यात शुक्रवारी आचरासमोरच्या वीस वाव समुद्रात मत्स्यव्यवसाय खात्याच्या शीतल या गस्तीनौकेने कारवाई करत रत्नागिरी येथील एक एलईडी ट्रॉलर पकडला. ट्रॉलरवर एलईडीचे दिवे, जनरेटर सापडून आले होते. त्यामुळे ट्रॉलर ताब्यात घेत येथील बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आला; मात्र आज हा ट्रॉलर पळवून नेल्याचे दिसून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने पकडलेला ट्रॉलर कसा पळवून नेला, असा प्रश्‍न मच्छीमारांनी उपस्थित करत मत्स्य व्यवसायचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, या संदर्भात तोरस्कर म्हणाले, "भाजप कायमच अनधिकृत मासेमारीच्या विरोधात आहे. विशेषतः परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर व एलईडी मासेमारीच्या अतिक्रमणाबद्दल संवेदनशील आहे. पळवून नेलेला ट्रॉलर रत्नागिरी येथील असून, त्या मागे कुणाचा आशीर्वाद आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. यापुढे पकडून आणलेला ट्रॉलर सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप चौकस राहणार आहे. अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे भाजपचे विशेष पथक मत्स्य व्यवसायबरोबर कार्यरत राहणार आहे.'' 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT