under the political leader pressure notice giver said rajan teli in sindhudurg 
कोकण

एका नेत्याच्या दबावामुळे नोटीस ; तेलींचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : राज्यातील एका नेत्याच्या दबावामुळेच भाजी मार्केटचे बांधकाम थांबविण्यासाठी नगरपंचायतीकडून नोटीस बजावली असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. तसेच मोफत बांधून मिळणाऱ्या भाजी मार्केटला नगरपंचायतमधील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन विरोध का करत आहेत? असाही प्रश्‍न त्यांनी केला.

येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ग्लोबल असोसिएटला नगरपंचायतीने बजावलेल्या नोटिशीबाबत खुलासा केला. ते म्हणाले, भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम थांबविण्याबाबत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे; पण नोटिसांसारख्या धमक्‍यांना घाबरणारा मी नाही. मला नोटीस बजावण्यामागे राज्यातील सत्ताधारी एका नेत्याचा हात आहे. त्याशिवाय मुख्याधिकारी नोटीस काढू शकत नाहीत.

वस्तुतः १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम आणि साडेपाच कोटी रुपये किंमतीचे भाजी मार्केट नगरपंचायतीला मोफत बांधून देण्याचा पहिलाच उपक्रम कणकवलीत पूर्णत्वास नेत आहोत; मात्र त्याचे नगरपंचायतमधील सत्ताधारी-विरोधकांना वावडे का? विरोध करण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी विरोधक एकत्र आले. किंबहुना सत्ताधारी-विरोधक एकत्र येण्यासाठी मी निमित्त ठरलो ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. मार्केट नको असेल तर सत्ताधाऱ्यांचे काय करायचे याचा विचार जनताच केल्याशिवाय राहणार नाही.

...तर सत्तेचा गैरवापर 

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. राज्यशासनाने विद्यमान संचालक मंडळाला आजवर तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्याचा फायदा घेत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी १०० हून अधिक उमेदवारांना जिल्हा बॅंकेत तात्पुरती नोकरी मिळवून दिली आहे. तसेच जिल्हा बॅंक निवडणुकीत बॅंक मतदार ठरविण्यासाठी सोसायट्यांना केवळ पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामध्येही राज्य सरकारकडून दबाव आणला जात आहे. या सर्व प्रकाराविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही श्री.तेली म्हणाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

World Cup उंचावणाऱ्या हातांना लागणार मेंहदी, स्मृती मानधनाच्या घरी आता लगीनघाई, कधी होणार विवाह?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT