Unique initiative on behalf of Mandangad Municipal Panchayat kokan marathi news 
कोकण

आपण खरंच कामासाठी बाहेर पडता का...? शहराला धोक्यात आणता का..?

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) :आपण खरंच कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात असा प्रश्न विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना मंडणगड शहरातील चौकात रेखाटलेल्या चित्रांतून केला आहे. घरात राहू या, कोरोना टाळूया असा संदेश देत जनजागृती केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी विविध उपक्रम राबवित नागरिकांना जागृत केले. मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या कल्पनेतून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. शहरातील स्वच्छतेवर भर देताना सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, बस स्थानक, मुख्य रस्ते, शासकीय कार्यलय परिसराचे औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले. शहरात अत्यावश्यक सुविधा व्यवस्थित चालू राहण्यासाठी नियोजन केले.

बाजारात होणारी गर्दी  झाली कमी

मंडणगड नगरपंचायतीच्या वतीने अनोखा उपक्रम राबवित नागरिकांना आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात सोशल डिस्टन्स राहण्यासाठी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर होणारी गर्दी लक्षात घेत, सुरक्षित अंतरावर चौकोन आखून अंतर ठेवले आहे. घरपोच सेवा दिल्याने बाजारात होणारी गर्दी आपोआप कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातून येणारे नागरिकही त्याचा अवलंब करीत आहेत.

नगरपंचायतीने केली अशी सुविधा

शहर परिसरात पंचायत समिती, मुख्य चौक, बस स्थानक परिसरात हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली. त्याठिकाणी साबण, सॅनिटायजर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना मास्कचे वाटप केले. नगरपंचायतीला विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्याधिकारी यांच्या विविध उपाययोजनांचे नागरिकांनी स्वागत केले असून कौतुक केले आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी अथक मेहनत घेत असून त्यांच्याही कामाला नागरिक सलाम करीत आहेत. शहरात चौकात चोविस तास सेवा देणाऱ्या पोलिस, अन्य कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी, नाष्टा याची व्यवस्था नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT