Urban kids get the feel of the village kokan marathi news
Urban kids get the feel of the village kokan marathi news 
कोकण

अखेर महिनाभराने तीनही भावंडे आई-वडिलांच्या कुशीत....

मयुरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) :  कोरोनामुळे तालुक्‍यातील दुर्गम भागात अडकलेल्या शहरी भावंडांना मानवी स्वभावाचे विविध रंग महिन्याभरात अनुभवास आले. आधी आसरा दिलेल्या घराने बाहेर काढले. परक्‍या गावात मित्राने आधार दिला. गावाच्या अविवेकी दबावतंत्रामुळे २० दिवसांनी मायेचा झरा आटला. माणुसकी, द्वेष, त्वेष, अहंकार, अस्थिरता, भय सोसावे लागले. आजारी बहिणीच्या उपचारांसाठी शासनही हतबल असल्याचे दर्शन घडले. अखेर अगतिकतेने घराकडचा मार्ग दाखविला. महिनाभराने तीनही भावंडे आई-वडिलांच्या कुशीत शिरली, तीही दमल्याभागल्या सरकारी यंत्रणेमुळे. 

मुंबईतील पंचविशीतील तीन भावंडे (२ बहिणी, १ भाऊ) गुहागर तालुक्‍यातील एका खेड्यात शिमगोत्सवासाठी मैत्रिणीकडे आली होती. शिमगोत्सवानंतर मुंबईला परतण्यामध्ये कोरोना आडवा आला. शृंगारतळीमध्ये रुग्ण सापडल्याने ते अडकून पडले. निघण्याच्या आदल्या दिवशी देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. या कालावधीत अनोळखी घराने त्यांना सामावून घेतले होते.

शहरी मुलांना मिळते खेड्याची अनुभूती...

गावातील माणुसकीचा झरा त्यांनी अनुभवला. पण त्यानंतर तीन दिवसातच चित्र पालटले. खेड्यातील कुटुंबाची जीवनशैली त्यांना अंगीकारता येईना, काम जमेना. त्यामुळे माणुसकी दाखविणाऱ्या कुटुंबात ते भार होऊ लागले. भावंडांना शहरीपणा बाजूला न ठेवता आल्याने तेथे वादही झाले. माणुसकी, संवेदनशीलता संपली. तुम्हाला तीन दिवस ठेवले, हेच पुष्कळ, आता बाहेर पडा, असे म्हणत त्या कुटुंबप्रमुखाने तिघांना हाकलून दिले. खेड्याचा हा नवा चेहरा त्यांना धक्कादायक होता. परिसर नवीन, माणसे अनोळखी, देशात लॉकडाऊन. घरी जाता येत नाही. आता पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आऽऽ वासून उभा होता. 

तुम्ही आसरा देता म्हणजे काय?
मात्र, एका विशालहृदयी मित्राने तिघांना आपल्या घरात आसरा दिला. दोनवेळच्या अन्नाची गरज मिटली. मात्र, तेथेही वेगळीच समस्या उभी राहिली. माणसांचा दुखावलेला अहंकार, अभिमान, सुप्त हेवेदावे, छुपा दुष्टावा याचे प्रच्छन्न दर्शन झाले. आम्ही ज्यांना घराबाहेर काढले, त्यांना तुम्ही आसरा देता म्हणजे काय? परगावातील मुलींना घरी कसे ठेवता, फिट येणाऱ्या मुलीचे बरेवाईट झाले तर काय, असे शेलके निरोप मिळू लागले. त्याला बधत नाही, म्हटल्यावर गावपातळीवरील दबावतंत्राचा वापर झाला. यातून माणुसकी म्हणून तिघांना आसरा देणारी माउलीही घाबरली. शेवटी गावगाडा सांभाळण्यासाठी कुटुंबाचा नाइलाज झाला. आजारी बहिणीसह साऱ्यांनी घराबाहेर व्हा, असे फर्मान निघाले. माणसातील हे विपरीत बदल तरुणांनी १५ दिवसांच्या अंतरात दोनदा अनुभवले. 

दुखण्यावर औषध नाहीच
खेडेगावातील जीवनशैली आणि लॉकडाउनमधील घुसमट यांचा परिणाम शहरी भावंडांवर झाला. एका बहिणीचे जुने दुखणे उफाळून आले. दोन दिवसांच्या अंतराने तिला फिट येऊ लागल्या. तिला द्यायच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन होते; मात्र गुहागर, शृंगारतळी, चिपळूण येथे कोठेही औषधे मिळाली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT