vaibhav naik challenge to narayan rane 
कोकण

राणेंनी पुढची निवडणूक लढवून दाखवावी ; वैभव नाईक यांचे खुले आव्हान 

राजेश सरकारे

कणकवली - शिवसेना संपवू पाहणार्‍या नारायण राणेंना सिंधुदुर्गातील जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा शिवसेना संपविण्याची भाषा करू नये. लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर 2024 ची निवडणूक त्यांनी लढवून दाखवावी, त्यांना पुन्हा एकदा दणदणीत पराभव पाहायला मिळेल, असे प्रत्यूत्तर आमदार वैभव नाईक यांनी येथे दिले.
 

राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला त्यांनी उत्तर दिले. नाईक म्हणाले, “राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना संपविण्याचे आव्हान दिलंय; पण त्यांचे आव्हान आम्ही 2014 च्या निवडणुकीत स्वीकारलं होतं. यात खुद्द राणेंनचा पराभव झाला. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाचाही लोकसभा निवडणुकीत आम्ही पराभव केला. जर नीतेश राणे भाजपच्या तिकिटावर लढले नसते तर त्यांनाही पराभवाचाच सामना करावा लागला असता.  

“कोकणातून शिवसेनेचे 11 आमदार पुढे नसणार असे राणे म्हणत आहेत; पण आम्ही पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे 21 आमदार निश्‍चितपणे निवडून आणून दाखविणार आहोत. खरं तर राणे जेव्हा जेव्हा शिवसेना संपविण्याची भाषा करतात, त्या प्रत्येकवेळी त्यांचाच पराभव झालांय आणि शिवसेना पक्ष सातत्याने वाढत आहे. एवढेच नव्हे तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राणेंनी 2019 ची निवडणूक लढायला हवी होती; पण पुन्हा एकदा पराभव नको म्हणून त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीतून पळ काढला होता. आता आमचे तुम्हाला आव्हान आहे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीला तुम्ही कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढवून दाखवा. त्यावेळी तुम्हाला कळेल की शिवसेनेचे 11 नव्हे तर 21 आमदार निवडून आलेले असतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल.”

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT