Vaibhavwadi molestation case against health officer 
कोकण

 आरोग्य अधिकाऱ्याविरोधात वैभववाडीत विनयभंगाचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील याच्याविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. एका महिला डॉक्‍टरने याबाबत काल रात्री येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेले तीन महिने त्या डॉक्‍टरने अश्‍लील मेसेज पाठवून हैराण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तालुक्‍यात ग्रामीण भागात संबंधित महिला डॉक्‍टर रुजू झाली. तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. पाटील कार्यरत आहे. रुजू झाल्यापासून त्यांचा डॉ. पाटीलशी संपर्क येत होता. कार्यालयीन कामानिमित्ताने संवाद होत होता; परंतु काही दिवसांनंतर डॉ. पाटीलने त्यांच्या मोबाईलला गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज पाठविण्यास सुरवात केली. महिला डॉक्‍टरला त्यात वावगे वाटले नाही; परंतु त्यानंतर डॉ. पाटीलने अश्‍लील मेसेज पाठविण्यास सुरवात केली. पहिलाच मेसेज आल्यानंतर त्यांनी त्याला असे मेसेज पाठवू नका, असे सुनावले. आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्या महिलेने त्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले; मात्र तो त्या महिला डॉक्‍टरला फोन करून चहा प्यायला घरी ये; मला मॅगी बनवून दे, चहा दे अशी मागणी करू लागला. कार्यालयात बोलवून आपण गोव्याला फिरायला जाऊया, असे म्हणत अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्‍टर ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्याने तिला कार्यालयीन कामानिमित्ताने त्रास देणे सुरू केले. अश्‍लील मेसेजचा सिलसिला सुरू ठेवला. त्या महिलेने बुधवार (ता.30) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात डॉ. पाटीलविरोधात 24 एप्रिल ते 14 जुलै या कालावधीत विनयभंग केल्याची फिर्याद दिली. 

पोलिसांनी डॉ. पाटीलविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार छाया शिंगारे तपास करीत आहेत. 

 
यापूर्वीही तक्रार अर्ज 
तालुका आरोग्य अधिकाऱ्याविरोधात यापूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सचिन बरगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आपल्यावर पाळत ठेवण्याचे काम डॉ. उमेश पाटील करीत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agniveer Scheme : अग्निवीरांबाबत लष्कराने घेतला मोठा निर्णय! जर 'परमनंट' व्हायचं असेल, तर लग्न करता येणार नाही

Video: हिंदू मंदिर लुटून मुस्लिम शहर उभं राहिलं! सोमनाथ मंदिराच्या लुटीला झाले एक हजार वर्षे; गझनीने नेमकं काय केलं होतं?

Pune Political: राष्ट्रवादी कॉंग्रेस श. प गटाच्या ५ उमेदवारांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई!

Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

UPSC Success Story : पित्याचे छत्र हरपले, आईचे कष्ट पाहावले नाही; दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, पहिल्यात प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण

SCROLL FOR NEXT