The victim journey to self confidence in oras kokan marathi news 
कोकण

देवगडमध्ये बळीराजा आत्मविश्‍वास यात्रेचा प्रारंभ.... 

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने राज्यात "बळीराजा आत्मविश्‍वास' यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा शुभारंभ आज येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला. ही यात्रा ओरोसहुन सोलापूरकडे रवाना झाली. ती सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, बिड अहमदनगर, अशी जाणार असून या यात्रेचा शेवट अहमदनगर जिल्ह्यात होणार आहे. 

हेही वाचा- सिंधुदूर्गात काढली यासाठी साडेतीनशे फूट तिरंगा रॅली...
बळीराजा आत्मविश्‍वस यात्रेचा शुभारंभावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रूचि राऊत, संदेश पारकर, अवधूत मालवणकर, देवगड शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम व माजी तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर, विष्णू घाडी आदी शिवसैनिक उपस्थित होते. ही यात्रा येथून सुरू होऊन उस्मानाबाद, बीड व अहमदनगर येथे जाणार आहे. या यात्रेचा समारोप अहमदनगर येथे 16 ला होणार असून 17 ला आंगणेवाडी यात्रेच्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना या यात्रेचा अहवाल देण्यात येणार आहे. यात्रेमध्ये सुमारे 20 कार्यकर्त्यांचे पथक असणार आहे. या यात्रेचे नेतृत्व देवगड तालुकाप्रमुख साटम व ऍड. करंदीकर करत आहेत. 

शेतकऱ्यांसाठीच ही यात्रा 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. हे निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून बळीराजाचा आत्मविश्‍वास दृढ करण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे हा हेतू या बळीराजा आत्मविश्‍वास यात्रेचा आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आधार देणे तसेच शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या यात्रेतून होणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT