village area primary hospitals covid centre proposal pending under the permission of collector in ratnagiri
village area primary hospitals covid centre proposal pending under the permission of collector in ratnagiri 
कोकण

गुहागरमध्ये कोविड केअर सेंटरच्या आशा मावळल्या

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ठेवता येणार नाही, असा नियम आहे. त्यामुळे आमदारांचे प्रयत्न यशस्वी होऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा होकार असूनही कोविड केअर सेंटरची निर्मिती मात्र नियमात अडकली आहे.

गुहागरच्या आरोग्य विभागाला रुग्णवाहिकेची आवश्‍यकता होती. ही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी पूर्ण केली. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी गुहागरमध्ये कोविड केअर सेंटर व्हावे, तेथे ऑक्‍सिजनची व्यवस्था हवी, अशी मागणी केली. या मागणीचा आमदार जाधव यांनी तत्काळ पाठपुरावा सुरु केला. ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.

रुग्णालयाची रचना लक्षात घेता, एका भागात कोविड रुग्णांना ठेवता येऊ शकते, अशी चर्चाही रुग्णालयातच झाली. तेथूनच आमदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कोविड केअर सेंटरला परवानगीविषयी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही या सेंटरला हिरवा कंदील दाखवला; परंतु ग्रामीण रुग्णालय अन्य रुग्णांवर उपचारासाठी वापरावे. कोरोना संदर्भातील कोणतीही कार्यवाही तेथे होऊ नये, असा नियम असल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळलाय.

ओपीडीत रुग्ण का नाहीत ?

ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी हक्काचे रुग्णालय आहे. गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला सुसज्ज इमारत आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्स, अन्य स्टाफ इथे आहे. प्रयोगशाळा आहे. आता रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे. मग रुग्णालयात रुग्ण का येत नाहीत? केवळ ४० ओपीडी असणे हे योग्य नाही. इतक्‍या सुविधा असूनही रुग्ण येत नसतील तर सेवेत कोणती कमी आहे, याचा शोध येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे, असे जाधव यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT