Water Source Information In Ratnagiri On One Click Marathi News 
कोकण

रत्नागिरीतील पाणी स्रोतांची माहिती एका क्‍लिकवर; कसे काय ? 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत जीपीएसद्वारे निश्‍चित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाला दिले होते. जिल्ह्यातील साडेसात हजारापैकी 5 हजार 668 पाण्याचे स्त्रोत जिओ टॅगिंग झाले आहे. त्याची माहिती एका क्‍लिकवर एमआरएसएसी (MRSAC) या पोर्टलवर मिळणार आहे. भविष्यात याच स्रोतावरुन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात मुख्यत्वे ग्रामीण जनतेला सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे यासाठी जिल्ह्यातील स्रोत निश्‍चित करून त्याची माहिती जीपीएसद्वारे पोर्टलवर टॅगिंग करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. त्यानुसार गेले दोन वर्षे त्याची माहिती पोर्टलवर घेतली जात आहे. यामध्ये नळपाणी योजना, विहिरी, झरे, हातपंप यांचा समावेश आहे.

सविस्तर माहिती होणार उपलब्ध

ऑफलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यात 7 हजार 790 स्रोत आहेत. पहिल्या टप्प्यात 3 हजार 802 स्रोतांची माहिती एका क्‍लिकवर आणली गेली. गतवर्षी 1 हजार 866 स्रोत जिओ टॅगिंग करण्यात आले. पाणी उपलब्ध असलेली माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. हे स्रोत दूषित केव्हा झाले होते, पाणी शुद्धीकरण केव्हा करण्यात आले, सद्यस्थितीत त्याचा वापर होतो किंवा नाही, जिओ टॅगिंग कुणी केले आहे, याची सविस्तर माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. 

बंद असलेले स्रोतही जिओ टॅगिंग 

माहिती एका ठिकाणी संकलित असल्यामुळे राष्ट्रीय पेयजल अंतर्गत पाण्याचे स्रोत शोधण्याची आवश्‍यकता लागणार नाही. कायमस्वरुपी बंद असलेले स्रोतही जिओ टॅगिंग केले जात आहेत. जेणेकरुन त्यावरुन पाणी पुरवठा योजना राबविल्या जाणार नाहीत. 

जीपीएसद्वारे निश्‍चित केलेले तालुकानिहाय पाण्याचे स्रोत  

  • दापोली - 37 
  • मंडणगड - 22 
  • गुहागर - 347 
  • रत्नागिरी - 356 
  • लांजा - 161 
  • संगमेश्‍वर - 454 
  • राजापूर - 138 
  • खेड - 149 
  • चिपळूण - 202  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : पायाभूत प्रकल्प तातडीने मार्गी लावा - मुख्यमंत्री

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

SCROLL FOR NEXT