कोकण

कोकण - कोविड नियमांचे पालन करून वॉटरस्पोर्टस् सुरू होणार

- प्रशांत हिंदळेकर

यावेळी कोविड नियमांचे पालन करून वॉटरस्पोर्टसला परवानगी देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

मालवण : कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्टस् सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली.

यावेळी कोविड नियमांचे पालन करून वॉटरस्पोर्टसला परवानगी देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. मेरीटाईम बोर्डने वॉटरस्पोर्टस् व्यावसायिकांना परवानग्या देऊन जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी लवकरच देतील अशी माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT