water falls 
कोकण

सिंधुदुर्गातील धबधबे, निसर्ग तुम्हाला खुणावतील़ पण तेथे जाता येणार नाही.....काय आहे कारण वाचा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर तेथील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने बंदी आणण्यात येत होती; मात्र जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यासह 11 ठिकाणांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापाठोपाठ पावसाळी पर्यटन हंगाम कोरडा जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. विषाणू प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मांगेली, तिलारी धरण, कोनाळकट्टा, बाबा धबधबा, कुंभवडे, आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, धामापूर तलाव, कासारटाका, सावडाव धबधबा, शिवडाव धबधबा या ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिकरित्या एकत्र येण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

आदेशांची अंमलबजावणी पोलिस प्रशासन, तालुका दंडाधिकारी, ग्रामपंचायत व इतर विभागांनी काटेकोरपणे करावयाची आहे. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र गुन्हा ठरणार आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. 

कोरोनाने शिरकाव केल्यानंतर केंद्राने 16 मार्चपासून लॉकडाउन केले. लॉकडाऊन मेपर्यंत राहिले. मे येथील पर्यटनाचा बहराचा कालावधी होता. पर्यटकच लॉकडाउन असल्याने जिल्ह्यात कोणी फिरकले नाहीत. परिणामी उन्हाळी हंगाम कोरडा गेला. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे काही कोटींचे नुकसान झाले. हा हंगाम गेल्यानंतर पावसाळी हंगाम तरी फलदायी जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाची दहशत कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्थिरावलेला आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केले. 

या वर्षी जिल्ह्यात एक जूनपासून पावसाने जोरदार आगमन केले आहे. त्यामुळे नदी, नाले, तलावे पहिल्या आठवड्यात भरून वाहू लागले आहेत. आंबोली, मांगेली, कुंभवडे येथील बाबा धबधबा, सावडाव व शिवडाव धबधबे प्रभावित झालेले आहेत. पावसाने सुरुवातीलाच जोरदार बॅटिंग केल्याने यंदा पावसाळी पर्यटनाला सुगीचे दिवस आल्याचे वाटत होते; पण कोरोनाने उन्हाळ्या पाठोपाठ पावसाळी पर्यटन कोरडे जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT