Whiskey delivery available at home in ratnagiri 
कोकण

'या' नंबरवर संपर्क साधल्यास व्हिस्की मिळतेय घरपोच ; दापोलीकर हैराण 

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : लॉकडाऊन सुरू असताना शासनाचा महसूल वाढविण्यासाठी मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दापोलीतही कालपासून मद्याचे दुकान सुरू झाली असतानाच आज फेसबुकवर दापोलीत मद्याची घरपोच सेवा देण्याची एक पोस्ट आल्याने दापोलीकरांनी या दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. 

फेसबुकवर ही पोस्ट आली असून 8473071415 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास व्हिस्की  घरपोच आणून दिली जाईल असे सांगण्यात येत असून मद्याची किंमत एमआरपी पेक्षा जास्त  सांगितली जात असून त्यांनी दिलेल्या खात्यात ऑनलाईन पैसे जमा केल्यास घरपोच मद्य आणून दिले जाईल असे या मोबाइल क्रमांकावरून बोलणारी शर्मा नामक व्यक्ती सांगत आहे. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे खेड येथील निरीक्षक शंकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाने घरपोच मद्य पुरविण्यासाठी कोणालाही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे यात फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे सांगत अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT