Who Is Leader Of Kolgaon Nirukhe Case BJP Demand 
कोकण

"त्या' घटनेचा मुख्य सूत्रधार कोण? भाजप जिल्हा चिटणीसांचा सवाल

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोलगाव निरूखे कोकण कॉलनी येथे लोकांनी विनाकारण धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, या हेतूने झालेल्या क्रियाशील घटनेची निपक्षपाती चौकशी करून शासनाच्या नियमाचा व कायदेशीर तरतुदीचा भंग करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध व या सर्व गोष्टींचा मुख्य सूत्रधार कोण शोधून योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी येथील पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याजवळ केली आहे. 

श्री. सारंग यांनी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाची प्रत प्रसिद्धीस दिली आहे. यात म्हटले आहे की, 16 एप्रिलला रात्री नऊ वाजता घडलेल्या प्रकारानंतर आपण घटनास्थळी गेलो असता याठिकाणी स्थानिक नागरिकांपेक्षा इतर बाहेरील तरुणांचा समावेश जास्त असल्याचे माझ्या निदर्शनास आले.

संबंधित शासनाच्या निर्णयाचे व नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन त्यांनी जमाव पांगवुन संबंधितांना पोलीस ठाण्यात नेले. माझ्या गावातील धर्मा धर्मामध्ये निष्ठुरता निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये, याकरता पोलिसांच्या सहकार्याने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही बाजूने सहकार्य न मिळाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. आपण कोळगाव येथे कायमचा रहिवासी असल्याने गावाचे वेळोवेळी प्रतिनिधित्व केलेले आहे.

या गावात विविध धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असून गावातील सर्व कार्यक्रम सण व उत्सव एकत्र साजरे करतात. राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम प्रामाणिकपणे करत असतात. असे असता विनाकारण धर्मा धर्मामध्ये हेतुपुरस्कर जातीय तणाव निर्माण व्हावा, या हेतूने काही लोक क्रियाशील आहेत व त्याचा परिणाम दुष्परिणाम सामाजिक शांततेवर घडत आहे.

त्यामुळे कोलगाव येथे घडलेल्या प्रकाराची निःपक्षपाती चौकशी करून विनाकारण जमा करून व शासनाच्या नियमांचा व कायदेशीर तरतुदींचा भंग करून हा प्रकार घडून करणाऱ्या प्रमुख सूत्रधार कोण शोध घेऊन संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी व सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी आवश्‍यक ती तजवीज करावी, अशी मागणी श्री. सारंग यांनी केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT