Why are gillnet fishermen on the verge of starvation 
कोकण

गिलनेट मच्छीमार का आहेत उपासमारीच्या वाटेवर

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण : पारंपरिक रापण व्यावसायिकांबरोबरच पारंपरिक गिलनेट मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांवर येत्या काही महिन्यांत उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. हातावर पोट असलेल्या मच्छीमारांना गेल्या वर्षभरापासून मासळी मिळण्याचे प्रमाण फारच घटले आहे. परिणामी सध्या शेकडो गिलनेटधारक नौका बंदावस्थेत किनाऱ्यावर उभ्या आहेत. 

गिलनेट म्हणजे छोट्या इंजिनच्या मदतीने किनाऱ्याच्या जवळपास होणारी पारंपरिक मासेमारी. यात आऊटबोट इंजिनधारक मांड व्यावसायिक, बुडाववाले, इनबोट इंजिनधारक बल्याववाले (न्हैयवाले) आणि वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले यांचा समावेश होतो. यातील मांड व्यावसायिक पारंपरिक मच्छीमारांचे बांगडा मासा ही प्रमुख कॅच. मात्र, यंदाच्या हंगामात जानेवारीपासून मे अखेरपर्यंत "बांगडा मासा गेला कुठे'? असा प्रश्‍न जिल्ह्यातील गिलनेटधारकांना पडला आहे. बांगड्याच्या कॅचमध्ये यावर्षी 85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. बळा मासाही मिळणे दुर्मिळ झाले आहे. दुसरीकडे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मात्र कोट्यवधी रुपयांचा बळा मासा पकडून आपल्या राज्याच्या मत्स्योत्पादनात भर घालत आहेत. 

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच राज्याच्या सागरी हद्दीत (12 सागरी मैल) घुसखोरी करून स्थानिक मच्छीमारांच्या हक्काच्या बळा माशाची कॅच लुटून नेत असल्याचे स्पष्ट होत आहे. 15 ते 20 वावात मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यात बळा मासा येण्यापूर्वीच हायस्पीड ट्रॉलर्सवाले तो लुटून नेत आहेत; मग स्थानिक मच्छीमारांना बळा मासा मिळणार कुठून? स्थानिक मच्छीमारांना रिकामी जाळे घेत परतावे लागत आहे, अशी कैफियत पारंपरिक मच्छीमारांनी मांडली. गिलनेटद्वारे पापलेट मासे पकडणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या पदरीही निराशाच आली आहे. 

मत्स्यदुष्काळामुळे मासेमारी बंदच आहे. आता कोरोनाच्या विश्‍वव्यापी संकटाचाही मुकाबला पारंपरिक मच्छीमारांना करावा लागत आहे. मत्स्यदुष्काळामुळे आहारातूनही मासे गायब झाले आहेत. आमटीला मासे मिळावेत म्हणून मासेमारीस गेल्यानंतर निराशाच पदरी पडत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. 


न्हैय व्यवसाय सुरमईअभावी अडचणीत 
बल्यावांद्वारे गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारी ही प्रामुख्याने सुरमईसाठी केली जाते; परंतु बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे त्यांना सुरमई मिळणे कठीण बनले आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून लाखो रुपयांची जाळी तोडून नुकसान केले आहे. दुसरीकडे काही मोजके एलईडी पर्ससीनधारक बांगडा, सुरमई, म्हाकूल, बळा, सौंदाळा वगैरे सर्वच माशांच्या साठ्यांवर डल्ला मारत असल्याने हजारो पारंपरिक मच्छीमारांवर आज बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. (क्रमशः) 

        काय आहे गिलनेट ? 

  • गिलनेटमध्ये आऊटबोट इंजिनधारक मांड व्यावसायिक, बुडाववाले, इनबोट इंजिनधारक बल्याववाले (न्हैयवाले) आणि वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले यांचा समावेश. 
  • मांड व्यवसायात थव्याने येणारा बांगडा मासा पकडणाऱ्या जाळ्यांचा वापर. 
  • आऊटबोट मासेमारीत फायबर पातीस (छोटी होडी) आऊटबोट इंजिन लावून मासेमारी. 
  • इनबोट इंजिनधारक (बल्याव) या प्रकारात दोन सिलिंडरच्या साहाय्याने मोठ्या फायबर होडीचा वापर करून मासेमारी. 
  • तियानीवाले या प्रकारात इंजिनचा वापर न करता वल्हवून मासेमारी. 
  • बुडाववाले या प्रकारात समुद्रतळाशी जाणाऱ्या छोट्या जाळ्यांच्या माध्यमातून मासेमारी 
  • हे पण वाचा - गुढ उकलले : अभ्यासकांचा अंदाज ; डॉल्फिनमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती कमी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT