दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी हालचाली सुरू आहेत.
दोडामार्ग : दोडामार्ग ते वीजघर या राज्यमार्गावरून (Dodamarg to Vijghar Route) प्रवास करणे आता अधिक सुखकर होणार आहे. या मार्गाची रुंदी वाढवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत ५.५० मीटर रुंद असलेला हा राज्यमार्ग ७ मीटर इतका रुंद होणार आहे.
याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Construction Department) अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. तालुक्यातील दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्ग रुंद होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कर्नाटक-बंगळुरू येथील एका खासगी कंपनीला या राज्यमार्गाचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
त्यानुसार या राज्यमार्गावरून दिवसाला किती वाहने धावतात व अद्ययावत राज्यमार्ग करण्यासाठी वाहनांचे भारमान किती आहे, याबाबतचे सर्वेक्षण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर केले. कंपनीचे काही कर्मचारी आंबेली येथे मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभे होते. त्यांच्याजवळ एक्सेल लोड मोजण्याचे यंत्रही होते. दोडामार्गहून वीजघरच्या दिशेने जाणाऱ्या व वीजघरहून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी व्यतिरिक्त सर्वच वाहनांची या यंत्रावर तपासणी करण्यात आली.
ही खासगी कंपनी हा सर्व डाटा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करणार आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून ते मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविणार आहे. मंत्रालय स्तरावर या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यास भविष्यात दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी हालचाली सुरू आहेत. या कामास मंजुरी मिळाल्यास या मार्गावरून प्रवास करणे सुखकर होणार आहे.
- अनिल बडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.