कोकण

Good News : क्‍यू आर कोड रोखणार हापूसमधील भेसळ

येत्या दोन दिवसात क्‍यू आर कोडचा स्टिकर लागलेली फळं बाजारात दिसणार

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : बाजारपेठेत ‘हापूस'ची कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त बागायतदारांना फळावर लावण्यासाठी क्‍यू आर कोड वितरित केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरीतील दोन बागायतदारांना प्रत्येकी दहा हजार कोड दिले आहेत. येत्या दोन दिवसात क्‍यू आर कोडचा स्टिकर लागलेली फळं नवी मुंबईतील बाजारात दिसणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोकणच्या आंब्याला हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण या पाच जिल्ह्यातील आंबा हापूस नावाने बाजारात दाखल होईल. अन्य कोणत्याही आंब्याला हापूस म्हणता येणार नाही. जीआय सर्टिफिकेट कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत बागायतदारांना दिले जाते. आतापर्यंत आठशेहून अधिक बागायतदार, प्रक्रियादार आणि व्यावसायिकांनी हे सर्टिफिकेट घेतले आहेत. बाजारपेठेत हापूसचा ब्रॅण्ड विकसित करण्याचा जीआयचा उपयोग होणार आहे.

कर्नाटकी आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी उत्पादक सहकारी संस्थेने पायलट प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक बागायतदाराला क्‍यू आर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन केला की त्या फळाची सविस्तर माहिती वेबसाइटवरून मिळू शकते. तो कोणत्या शेतकऱ्याच्या बागेतून आला आहे, वापरकर्ता कोण, जीआय सर्टिफिकेट आहे का, फळातील न्यट्रिशिअन्स कोणती आहेत याची सविस्तर माहिती त्यात मिळेल. क्‍यू आर कोडचे स्टिकर प्रत्येक फळावर लावण्यात येणार आहे. जेणेकरून कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखणे शक्‍य होईल. त्याची अंमलबजावणी येत्या महिन्याभरात केली जाणार आहे. या अंतर्गत रत्नागिरीतील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे आणि सलिल दामले यांना क्‍यू आर कोड असलेले प्रत्येकी दहा हजार स्टिकर दिले आहेत. क्‍यू आर कोडचा स्टिकर लावलेला आंबा दोन दिवसात नवी मुंबईतील बाजारात दाखल होत आहे. या पद्धतीने हापूसचे बॉक्‍स भरले आहेत.

"यंदा क्‍यू आर कोडचे १ लाख स्टिकर तयार केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्याची माहिती जीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केली जाईल. या माध्यमातून अस्सल हापूस कसा ओळखावा, हे लोकांपर्यंत पोचणे शक्‍य होणार आहे."

- डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT