without mask people to punish rupees 500 from today in ratnagiri 
कोकण

विनामास्क फिरा आणि पाचशे रुपये भरा ; जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लोकांमधील हलगर्जीपणा दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यापुढे विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता पोलिस थेट कारवाई करून 500 रुपयांचा दंड वसूल करणार आहेत. जिल्ह्यात आजपासून या कारवाईला सुरवात होणार आहे.

 पाहिले दोन दिवस पोलिस नागरिकांमध्ये जनजागृती करणार व त्यानंतर ज्या नागरिकांच्या तोंडावर मास्क नसतील त्यांच्यावर पाचशे रुपये दंड वसूल करणार आहेत. हा दंड कोणताही पोलिस कर्मचारी करू शकणार आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना देखील अनेकजण शहरात विनामास्क फिरताना दिसून येत आहे.

यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ग्रामपंचायत, पालिकेसह पोलिसांनाही दंडवसुली बाबत आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून आजपासून विना मास्क फिरणाऱ्याना पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT