Ceiling Fan esakal
कोकण

Devgad Crime : घरी सिलींग फॅन आहे? मग विशेष काळजी घ्या, अन्यथा मोठी दुर्घटना घडेल!

झोपलेल्या ठिकाणी डोक्यावरील छपरावर असलेल्या पाईपचा स्क्रू गंजून सिलींग फॅनचा गड्डा तूटून त्यांच्या अंगावर पडला.

सकाळ डिजिटल टीम

त्यांच्या बरगड्यांवर फॅनचा गड्डा पडून त्यांना मुका मार लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या तिथेच वेदनेने कण्हत होत्या.

देवगड : सिलींग फॅनचा (Ceiling Fan) गड्डा तुटून अंगावर पडून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचाराचादरम्यान मृत्यू झाला. येथील पवनचक्की सुमतीनगरमध्ये ही घटना घडली. अंजली अशोक चिंदरकर (वय ६३) असे त्यांचे नाव आहे.

ही घटना काल सकाळच्या सुमारास घडली. याबाबत येथील पोलिस (Devgad Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिली. अंजली चिंदरकर यांची तब्येत बरी नसल्याने त्या घरात झोपल्या होत्या.

त्या झोपलेल्या ठिकाणी डोक्यावरील छपरावर असलेल्या पाईपचा स्क्रू गंजून सिलींग फॅनचा गड्डा तूटून त्यांच्या अंगावर पडला. त्यांच्या बरगड्यांवर फॅनचा गड्डा पडून त्यांना मुका मार लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या तिथेच वेदनेने कण्हत होत्या.

हे निदर्शनास येताच तातडीने त्यांच्या पतीसह नातेवाईकांनी रिक्षातून त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT