the woman thief arrested by a police who was prosecution in ratnagiri with the help of dog found her theft 
कोकण

श्वान महिलेभोवती घुटमळा अन् फिर्यादी महिलाच निघाली चोर

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्‍यातील पाचल मुस्लिमवाडी येथील दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात फिर्यादी असलेल्या अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पैशासाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने पोलिसांना दिली. यातील चोरीला गेलेला ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या तिने पोलिसांकडे सुपूर्द केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला आहे.

पाचल मुस्लिमवाडी येथील अफसाना ताजुद्दीन टिवले यांनी बुधवारी (१८) सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद राजापूर पोलिसांत दिली होती. तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरीतून श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वानपथकाचे प्रमुख भूषण राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान घरातच या फिर्यादी महिलेभोवती घुटमळत होता.

पोलिसांना या फिर्यादी महिलेबाबतच शंका आली. घरातील मंडळींनादेखील याबाबत विश्वासात घेत पोलिसांनी या महिलेला विचारणा केल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने आपणच चोरी केल्याची कबुली घरच्यांच्यासमोरच पोलिसांना दिली. दीराच्या कपाटातील रोख रक्कम व दागिने आपण चोरल्याचे सांगितले; मात्र त्यांच्याच कपाटातील दागिने व रोख रकमेची चोरी झाली, याबाबत शंका येऊ नये, म्हणून आपलेही दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचा बनाव केला. महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून तिला गुरुवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

कार्यपद्धतीची चुणूक दाखविली

रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार पोलिस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्याकडे दिला आहे. तळेकर यांनी चोरीचा २४ तासाच्या आत तपास लावत कार्यपद्धतीची चुणूक दाखविली आहे. राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेकर यांसह पोलिस कर्मचारी अनंत तिवरेकर, भिम कुळी, किरण सकपाळ यांनी ही विशेष कामगिरी केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

DAYA DONGRE DIED: एका युगाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; प्रेक्षकांची खट्याळ सासू हरपली

Raju Patil: भाजपचं प्रेम फक्त निवडणुकीपुरतं, इफ्तार पार्टीवरून राजू पाटील यांचा टोला

Ganesh Kale Murder Case: गणेश काळे खून प्रकरणातले चार आरोपी सराईत गुन्हेगार; दोन अल्पवयीन आरोपींवरही गुन्हे

मी तशी नाहीये... 'कमळी' मालिकेतील भूमिकेमुळे होणाऱ्या टीकेवर अनिकाने मांडली बाजू; म्हणते, 'मला वाईट वाटतं जेव्हा...

SCROLL FOR NEXT