Workers at Petrol Pump in Dapoli have no mask to defend Corona 
कोकण

या कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती नाही का? मालकांकडून परवड

सकाळ वृत्तसेवा

दापोली : जगभरात कोरोना विषाणूमुळे हलकल्लोळ उडाला असून कोरोनाची बाधा हाऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, दापोली शहरातील पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी मात्र या उपाय योजनांपासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी ना  पेट्रोलियम कंपन्यांना आहे, ना मालक वर्गाला आहे. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

दापोली शहरातील विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी हजारो गाड्या दररोज येतात. या गाड्यांसंमध्ये इंधन भरण्यासाठी गाड्यांच्या चालकाशी या कर्मचाऱ्यांचा कायम संपर्क येतो. चालकाकडून पैसे घेणे, पैसे नसतील तर कार्ड स्वाईप करणे अशी विविध कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. मात्र या कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप मालकांनी अद्याप मास्कही दिलेले नाहीत. तसेच सॅनिटायझरही उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे बाहेरून येणारा पर्यटक किंवा गाडी चालक जर कोरोना संसर्ग बाधित असेल तर त्यापासून आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होईल अशी भीती या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात असून पेट्रोलियम कंपन्यांनी किंवा पंप मालकांनी या कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत आहे.

संदर्भात दापोली येथील भारत पेट्रोलियमचे डीलर मे. जी बी मेहता अँड सन्सचे मालक आशिष मेहता यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही आमच्या पंपावर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर देणार आहोत, मात्र सध्या या दोन्ही वस्तूंचा तुटवडा असून मार्केटमध्ये त्या उपलब्ध होत नाहीत, त्यांची ऑर्डर आम्ही दिली असून त्या मिळताच कर्मचार्यांना दिल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांना बंदी

Team India New Coach: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम बदलली, आता कोचही बदलणार, गौतम गंभीरचा पत्ता कट ? नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT