कोकण

'येत्या 2 दिवसांत खोदाईचे काम मार्गी लावा'

ज्यादा कामगार लावा आणि जी खोदाई सुरू केली आहे, ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करून घ्या.

रुपेश हिराप

ज्यादा कामगार लावा आणि जी खोदाई सुरू केली आहे, ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करून घ्या.

सावंतवाडी : शहरात दिवाळीच्या तोंडावर रस्ते खोदाई करण्याचे सुरु असलेले काम जलद गतीने दोन दिवसात पूर्ण करा, असे जिओ कंपनीच्या वरिष्ठांना सांगितले असून याबाबत मी संबंधितांशी चर्चा केल्याचे आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार केसरकर यांच्या कार्यालयांमध्ये आज शिवसेना नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहर प्रमुख नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, शिवसेनेच्या नगरपरिषद गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार केसरकर म्हणाले, 'सावंतवाडी शहरामध्ये सुरू असणारी रस्ते खोदाई ही ऐन दिवाळीच्या तोंडावर असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळी सणाच्या काळात रस्ता खोदाई सुरू असल्यामुळे व्यापार उदीमाला अडथळा येईल अशी भीती आहे. यामुळे जिओ कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केली आहे. ज्यादा कामगार लावा आणि जी खोदाई सुरू केली आहे, ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करून व्यापारी व ग्राहकांना अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या. बाजारपेठेतील रस्ता जिओ कंपनीने केबल टाकून जलद गतीने पूर्ववत करून घेतील असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT