Written consent of landowners for refinery Project in Barsu refinery project Purushottam Khambal ratnagiri
Written consent of landowners for refinery Project in Barsu refinery project Purushottam Khambal ratnagiri sakal
कोकण

रत्नागिरी : रिफायनरीसाठी जमीनमालकांची लेखी संमती

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेचार हजार एकर जमिनीपैकी गोवळ, शिवणे आणि धोपेश्‍वर-बारसूमधील सुमारे २३०० एकरच्या मालकांनी प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत आपली जमीन देत असल्याची लेखी संमती दिली आहे. या संमतीपत्रांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याची माहिती धोपेश्‍वर ग्रामीण रिफायनरी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल यांनी दिली. ज्या भागात प्रकल्प प्रस्तावितच नाही, तेथील लोकांना एकत्र करून विरोध दाखवण्याचे षडयंत्र नाणारनंतर आता अन्य भागात केले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी केली जात असून, त्या अनुषंगाने या परिसरामध्ये विविध प्रकारची चाचपणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. नाणारप्रमाणे गोवळ-शिवणे येथील लोकांनी रिफायनरी प्रकल्प उभारणीला विरोध केला आहे. मात्र, त्याचवेळी धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये प्रकल्प समर्थकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. प्रकल्प समर्थकांची वाढती संख्या आणि प्रकल्प जमीन देण्यासाठी जमाल मालकांकडून दिली जात असलेली संमतिपत्रे याकडे खांबल यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ते म्हणाले, ‘‘रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेचार हजार एकर जमिनीपैकी गोवळ, शिवणे आणि धोपेश्‍वर-बारसूमधील सुमारे २३०० एकरच्या जमीनमालकांनी प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत आपली जमीन देत असल्याची लेखी संमती दिली आहे. त्यामध्ये वाढ होत चालली आहे. ही जमीनमालकांची संमतीपत्रे येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकारी आणि एमआयडीसी विभागाला सादर करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांनी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावर भाष्य केले.

विरोध-विरोध म्हणून जो भासवण्यात येत आहे त्यामध्ये एनजीओंचा पुढाकार असून त्याची योग्य ती दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात जमीनमालक कोण आणि विरोधासाठी गर्दी करणारे ग्रामस्थ कुठले? यांचा तपास पोलिस आणि महसूल यंत्रणेने करणे अपेक्षित आहे.

शिवणेत ४०० एकरांच्या मालकांची संमती

शिवणे येथील ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध असल्याचे भासवण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे चारशे एकरच्या जमीनमालकांनी संमती दिल्याचे सांगताना खांबल यांनी प्रकल्पाच्या गुणदोषांवर कोणतीही चर्चा न करता सुरू असलेली प्रकल्प विरोधातील नाटके कोकणच्या विकासाच्या मुळावर उठल्याची टीकाही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT