This year Ram festival watch is not ready in sadvali kokan marathi news 
कोकण

यंदा रामाचा पाळणा सजलाच नाही,पालखीही राहीली रिकामी....

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) :कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सण,उत्सवाला बंदी असल्याने देवालये यातुन सुटले नाहीत.गुरुवारी रामजन्मोत्सव असुनही रामाचा पाळणा सजलाच नाही व प्रदक्षिणेची पालखीही रिकामी राहीली.राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीतही कुठे ऐकु आले नाही.


देवरुख वरची आळी येथील श्री रघुपती मंदिरात गुढीपाडव्यापासुन भोवत्या,आरत्या,पालखी प्रदक्षिणा असे रामजन्मोत्सवापर्यंत सुरु असते.रामनवमीला रामजन्मोत्सवाचे कीर्तन,रामजन्म,सजवलेला पाळणा तसेच सुवासिंनीनी रामाला जोजवणे,कानात कुर्र करणे असे सर्व होत असते.केशव साने,चंद्रशेखर साने,शैलेश साने,वासुदेव साने,प्रमोद साने ,असा साने परीवार येथील मानकरी आहेत.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व विधी होत असतात.

मंदिराच्या इतिहासात प्रथम ही गोष्ट घडली.​

संध्याकाळी श्रीरामांची पालखी शहरातुन प्रदक्षिणा घालण्यासाठी फिरवली जाते.राञी करमणुकीचे कार्यक्रम होतात माञ यंदा कोरोनामुळे लाॅकडाउन प्रक्रियेमुळे यातले काहीच झाले नाही.फक्त मुर्तीपुजा केली गेली.मंदिराच्या इतिहासात प्रथम ही गोष्ट घडली.यावर्षी घरी बसुनच भाविकांनी रामनाम जप,रामरक्षा म्हणुन रामनवमी साजरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live: छगन भुजबळांचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे हिसकवणार... आज होणार फैसला

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

Chandrapur News: किडनी विक्रीच्या जाळ्यात बांगलादेशातील तरुण; पीडितांमध्ये राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेशचे युवक

Latest Marathi News Live Update: दिल्लीचा AQI आज ४०० पेक्षा जास्त; विषारी हवेने राजधानीला वेढले

Panchang 21 December 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT