yesterday the on small tea shop one man attained suicide but now today he take decision shop remove from this area in ratnagiri 
कोकण

अखेर नगरसेवकानेच तो खोका तोडण्याची केली तयारी

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : अनधिकृत खोक्यावरील प्रशासनाच्या कारवाईवर नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तरीही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे माजी नगरसेवकाने आपले बांधकाम स्वतःहून हटवण्याची तयारी केली आहे. प्रशासनाच्या कारवाईत अडथळा आणला म्हणून माजी नगरसेवकासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिपळूण शहरातील शिवनदी लगत माजी नगरसेवक रमेश खळे यांनी अनधिकृत खोका उभारून तेथे चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. शिवनदी लगत खळे यांचे वडापाव विक्रीचे दुकान होते. त्याठिकाणीच त्यांनी पत्र्याची पक्की शेड टाकून चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सोमवारी आमदार शेखर निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदींच्या हस्ते खळे यांच्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी खोक्याचे बांधकाम सुरू असताना प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी खळे यांना बांधकाम करू नका अशी तंबी दिली होती.

परंतू दिवाळीनिमित्त असलेल्या सुट्टीची संधी साधत त्यांनी बांधकाम केले आणि व्यवसायाला सुरवातही केली. त्यानंतर मंगळवारी पालिका सुरू झाल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथक जेसीबी घेवून खळे यांचा खोका पाडण्यासाठी गेले. त्यानंतर खळे व त्यांचा मुलगा साहिल यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देत पालिकेच्या कारवाईत अडथळा आणला. पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतले होते. मात्र खळे खोक्यावर चढले होते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेता आले नाही. त्यांनी पालिका आणि पोलिस यांना वेटीस धरण्याचा प्रयत्न केला परंतू पालिकेचा प्रशासन विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहिला. 

खळे यांनी आपला खोका तुटू नये यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न केला. प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय अधिकार्‍यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतू खळे यांनी पालिकेच्या कारवाईला आव्हान दिल्यामुळे प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर खळे यांनी आपला खोका स्वतःहून तोडण्याची तयारी दर्शवली आहे.

रमेश खळे यांनी ज्याठिकाणी पत्र्याचे पक्के बांधकाम केले होते. त्याच ठिकाणाहून महावितरणची 33 केव्हीची विद्युत वाहिनी जाते. वीजेचा खांबही त्याठिकाणी आहे. खोक्यात चहा आणि इतर पदार्थ बनविण्यासाठी खळे गॅसचा वापर करतात. जर तिथे एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार ? यापूर्वी ते हातगाडीवर वडापावचा व्यवसाय करत होते त्याकडे पालिकेने दुलर्क्ष केले. पालिकेची कारवाई टाळण्यासाठी कोणी आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्याला प्रशासन घाबरले तर केवळ चिपळूणमध्ये नव्हे राज्यात ही सवय लागेल. त्यामुळे प्रशासनाला कठोर राहणे भाग झाले.

- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी चिपळूण पालिका

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT