zenith waterfall sakal
कोकण

Zenith Waterfall : परतीच्या पावसाने खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर तरुणी गेली वाहून; मृतदेह लागला हाती, 6 जणांना वाचवण्यात यश

झेनिथ धबधब्यावर पाण्यात आनंद घेण्यासाठी गेलेले सहा जणांपैकी एक तरुणी वाहून गेली आहे. तिचा मृतदेह हाती लागला असून पाच जणांचे बचाव कार्य सुरू आहे.

अमित गवळे

पाली - रायगड जिल्ह्याला बुधवारी (ता. 25) मुसळधार पावसाने झोडपले आहे. परिणामी नदी नाले व धबधबे भरभरून वाहत होते. अशावेळी खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर पाण्यात आनंद घेण्यासाठी गेलेले सहा जणांपैकी एक तरुणी वाहून गेली आहे. तिचा मृतदेह हाती लागला असून पाच जणांचे बचाव कार्य सुरू आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता. त्याकडे दुर्लक्ष करून खोपोलीच्या झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेसंबंधीय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सातजण त्या ठिकाणी अडकून पडले. पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तीन महिला बुडू लागल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केले असता आयेशा शेख आणि मोनिका शिरसागर या महिलांना वाचवण्यात यश आले.

मात्र त्यापूर्वीच स्वप्नाली क्षीरसागर (वय-22) ही युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. प्राप्त वर्णनानुसार तीचा खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने शोध घेतला असता साधारणता एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले. दुदैवाने ती युवती मृत अवस्थेत आढळली.

खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांनी पावसाळ्यापूर्वीच दुर्घटना होऊ नये यासाठी रोप आणि चेन बॅरीकेडींगची उपाय योजना केली होती त्यामूळे मोठी दुर्घटना टळली.

यंदा संपूर्ण पावसाळ्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगली होती मात्र परतीच्या पावसाने घात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT