young girl dead in accident at ratnagiri 
कोकण

रत्नागिरीतील अपघातात तासगावची तरुणी ठार 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - तालुक्‍यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज संपत पाटील (29, वाघ गल्ली, मांगले, ता. शिराळा) असे जखमी तरूणाचे नाव आहे. अपघात दुपारी साडेबारा वाजता करबुडे फाटा येथे झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूरहून (जि. कोल्हापूर) दोघे आज गणपतीपुळे येथे दुचाकीवरून फिरण्यासाठी निघाले होते. निवळी ते गणपतीपुळे असा प्रवास करीत असताना करबुडे फाट्यापासून काही अंतरावर समोरून आलेल्या ट्रकने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला त्याचा अंदाज न आल्याने रस्ता सोडून दुचाकी खाली कोसळली. अपघातात कोमल हिला जबर मार बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सूरज गंभीर जखमी झाला. 

दरम्यान, या अपघातातील मृत तरुणी जयसिंगपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती शेवटच्या वर्षाला होती, तर तरुण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. पोलिस निरीक्षक सुरेश कदम याचा अधिक तपास करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मध्यरात्री थरार! आईच्या कुशीतून बाळाला उचललं, चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडत प्राण्याने छातीसह खाल्ले दोन्ही हात

Sangli Election : महापालिका निवडणुकीत हलगर्जीपणाला थारा नाही; कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा सत्यम गांधींचा इशारा

Nashik Leopard : 'बिबट्यामुक्त' नव्हे, 'बिबट्या संघर्षमुक्त' नाशिक! वन विभागाचा १६ कोटींचा मास्टर प्लॅन तयार

Mumbai Metro: ‘मेट्रो ४’च्या कामात मंत्र्याची आडकाठी, सहा स्थानकांसाठी आलेल्या निविदा न उघडण्याबाबत दबाव

Miraj Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कडक बंदोबस्त; शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती

SCROLL FOR NEXT