youth Made paddle sanitizer machine konkan sindhudurg 
कोकण

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सिंधुदुर्गातील युवकांची कल्पकता

महेश चव्हाण

ओटवणे (सिंधुदुर्ग) - जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यामुळे सॅनिटायझेशनचे महत्त्व अधिक गडद झाले आहे. हे लक्षात घेऊन डेगवे येथील भाग्येश देसाई आणि कळणे येथील लक्ष्मण भिसे यांनी संयुक्त कल्पनेतून पॅडल चलीत हॅंड सॅनिटायझर मशीन निर्माण केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे. 

सार्वजनिक ठिकाणी जसे ऑफिस, दुकान, कंपनी गेट, हॉटेल्स, हॉस्पिटल्स तसेच विविध वर्दळीच्या ठिकाणी हात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हॅंड सॅनिटायझरची बॉटल्स सामान्यतः वापरली जातात; पण काही ठिकाणी एकच बॉटल्स आणि अनेक लोक त्याचा वारंवार वापर करतात. हाताचा वारंवार बॉटल्सला स्पर्श होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे या अडचणीवर मात करता यावी, यासाठी डेगवे येथील पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर असलेले श्री. देसाई आणि कळणे येथील श्री. भिसे यांनी आपल्या संकल्पनेतून हात न लावता पायाने चालविता येईल, अशी हॅंड सॅनिटायझर मशीन साकारली आहे. 

ही मशीन वापर करण्यासाठी विजेची गरज नाही. पायाने पॅडलवर दाब दिल्यानंतर सुलभपणे हातावर सॅनिटायझर पडेल, अशी सोपी व्यवस्था आहे. मशीन कोणत्याही यंत्राद्वारे चालविली जात नसल्याने त्यावर दुरुस्तीचा मोठासा खर्चही नाही. या मशीनमध्ये कुठल्याही आकाराच्या सॅनिटायझर बॉटल्स बसविता येतील, अशी व्यवस्था केली आहे. ही मशीन कुठेही सोयीस्कररित्या हलविता येते. अशी एकदम सोप्या व तंत्रशुद्ध पद्धतीने ही मशीन बनविण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही मशीन सार्वजनिक ठिकाणी उपयुक्त ठरत असून सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग याबरोबर गोवा राज्यात देखील या मशीनची मागणी वाढत असल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली. आजपर्यंत त्यांनी 150 एवढ्या मशीन वितरित केल्या आहेत. त्यांच्या या अभिनव प्रयोगामुळे श्री. देसाई यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण सहकार्य देऊन या लढाईत सहभागी होत आहे. आमचा सुद्धा तोच मानस असून या मशीनच्या आधारे व्यक्तीचा थेट होणारा संपर्क कमी होऊन कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखला जाणार आहे. त्याअनुषंगाने ह्या मशीन आम्ही उपलब्ध करीत आहोत. या मशिनसाठी माझे काका आणि ओटवणे श्री रवळनाथ विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. 
- भाग्येश देसाई, मॅकेनिकल इंजिनिअर, डेगवे 

खरंतर या लॉकडाऊनच्या काळात नोकरीवर जाता येत नसल्याने बऱ्याच सुशिक्षित युवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत देखील आपल्या शिक्षणाचा वापर करून रोजगार निर्माण करणाऱ्या श्री. देसाई आणि श्री. भिसे यांनी इतर युवकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अशा होतकरू युवकांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावण्याची आज गरज आहे. 
- राजेंद्र देसाई, मुख्याध्यापक, श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणे  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT