Youth Torture Girl Crime Under Posco Law Sindudurg Marathi News  
कोकण

माझ्याशी लग्न नाही केलं तर...

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारीन, अशी धमकी देऊन अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोविंद शंकर नाईक (वय 25 रा. आरोस, दांडेली वरचावाडा) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात पॉक्‍सो (लैगिंक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण 2012) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - गोविंद नाईक गोव्यात कामाला आहे. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यामागे आहे. त्याने संबंधित युवतीला लग्नाची मागणी घातली होती; मात्र युवती त्याचे ऐकत नसल्याने तो मोटारसायकलने पाठलाग करून त्रास देत होता. या युवकाला कुटुंबियांकडून समज देण्यात आली होती; मात्र असे असतानाही काल (ता.11) गोविंद याने युवतीला तू माझ्याशी लग्न कर, तुझ्याशी प्रेम आहे, तू लग्न नाही केल तर मी तुझ्या आई वडिलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या आईवडिलांना सांगितले. त्यानुसार तिच्या वडिलांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

त्यानुसार गोविंदवर पॉक्‍सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब बाबर, हवालदार गुरुदास नाईक यांनी गोविंदला रात्री अटक केली. त्याच्याकडील मोबाईल व मोटरसायकल जप्त केली. त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. याबाबतचा तपास महिला पोलिस अधिकारी रुपाली गोरड करीत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

IPL 2026 Auction live : ७७ खेळाडूंचं नशीब बदलणार, २३७.५५ कोटींचा पाऊस पडणार... ऑक्शन केव्हा, कुठे व किती वाजता होणार; जाणून घ्या सर्व माहिती

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

जनावरांच्या बाजारात रिपोर्टिंग करत होती पत्रकार, बैलानं अचानक केला हल्ला; VIDEO VIRAL

Mumbai-Nashik: मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग ४ महिने बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT