कोकण

निवडणूक लढण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले,...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जनता देईल, त्या आदेशानुसार मी निवडणूक लढेन. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ असणार आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. प्रत्येक भागात आपल्याला निमंत्रित केले जाते. त्यात कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईचा समावेश आहे. परंतु महाराष्ट्र राज्य हाच माझा मतदारसंघ आहे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.  

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री रत्नागिरी तालुक्‍यात दाखल झाली. हातखंबानजीक जाहीर मेळाव्यात ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

ते म्हणाले, कोकणबद्दलची चर्चा मुंबई महानगरपालिकेत होते. कोकणचे अनेक दौरे यापूर्वी झाले आहेत. प्रत्येक दौऱ्यात कोकणवासियांचे प्रेम मला मिळाले. कोकण आज भगवेमय झाले आहे. कोकणातील सर्वाधिक विकासकामे शिवसेनेने केली. वंचितांवर, शेतकऱ्यांवर कोणते अन्याय होताहेत, हे ऐकण्यासाठी मी येथे आलो आहे. न्यायहक्कासाठी मी मंत्रालयात आवाज उठवणार आहे. बेरोजगार मुक्त, कर्जमुक्त, प्रदूषणमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र असला पाहिजे. कारण महाराष्ट्रात शिवशाही असली पाहिजे. 

एक लाख मताधिक्‍याचा विश्वास 
विरोधकांनी शिवसेनेची ताकद ओळखावी, सभागृहातील कार्यकर्त्यांची संख्या विरोधकांनी बघावी. विनायक राऊत यांना 60 हजारांचे मताधिक्‍य जनतेने दिले आहे. त्याच ताकदीमुळे मी रत्नागिरी - संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार झालो. आता भास्कर जाधव देखील शिवसेनेत आले. रायगडला अवधुत तटकरेंनी प्रवेश केला. ते फक्‍त शिवसेनेमुळेच शक्‍य झाले. शिवसेनेत जसे कार्यकर्ते आहेत, तसे कार्यकर्ते अन्य कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. माझ्या विजयाचा संकल्प आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळेच मला एक लाख मताधिक्‍याचा विश्वास आहे, असे आमदार सामंत यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT