zunju manju short film in international festival in mangadgad ratnagiri 
कोकण

इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये कोकणचा ‘झुंजुमुंजु’; स्पर्धा आता विदेशातील लघुपटांशी

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोल्हापूर, औरंगाबाद फेस्टिव्हलनंतर मंडणगडचा ‘झुंजुमुंजु’ लघुपटाचा आता बाईस्कोप इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये प्रवेश झाला असून देशविदेशातील लघुपटांशी स्पर्धा करणार आहे. स्वराज्य चित्रपट संघटनेच्यावतीने आयोजित या फेस्टिवलमध्ये लाखोंच्या रोख रक्कमेसह शंभरपेक्षा अधिक पुरस्कारांची खैरात असून फिल्ममेकर यांच्याकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मंडणगडचे कलाक्षेत्र या निमित्ताने कार्यान्वित झाले असून गरुडझेप घेण्यास सज्ज झाले आहे. 

स्वराज्य चित्रपट संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या बाईस्कोप शॉर्ट फिल्म महोत्सवात इटली, थायलंड, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, बेल्जियम, जर्मनी आणि भारतातील अनेक शॉर्ट फिल्म या महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. अंधश्रद्धेवर शिक्षणाच्या माध्यमातून भाष्य करणारा आणि मंडणगडच्या ग्रामीण नैसर्गिक वातावरणात चित्रीकरण करण्यात आलेला झुंजुमुंजु आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. रोख रक्कम व अनेक पारितोषिकांचा समावेश असलेल्या या महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट कथा, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कलाकार, बालकलाकार पटकथा, पोस्टर डिझाईन, डीवीपी, स्क्रीन, संवाद लेखन, चित्रीकरण अशा विविध प्रकारचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.

महोत्सवाचे आयोजक प्रकाश यादव यांनी फिल्म मेकर्स यांना आपल्या शॉर्ट फिल्मसह महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. फेस्टिवलचे मार्केटिंग विधान पवार, अतुल पवार, शुभम पाटील हे सांभाळत आहेत. फेस्टिवलसंदर्भात संपूर्ण माहिती आयोजकांच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. अधिकृत फेसबुक पेज @swarajyabioscopeshortfilmfestival, अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट @bioscopeshortfilmfestival२०२१, Mail-bioscopeshort-filmfestival२०२१@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

सर्वोत्कृष्ट लघुपटास रुपये ५१ हजार

या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटास रुपये ५१ हजार, द्वितीय रुपये ३१ हजार, तृतीय रुपये २१ हजार यासह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविणार आहे. तसेच संगीत व्हिडिओ या प्रकारात प्रथम २१, द्वितीय १४ व तृतीय ७ हजार रक्कमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करणार आहे.

"स्वराज्य चित्रपट संघटना ही एक कलाकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संस्था आहे. कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वराज्य बाईस्कोप शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल सर्व कलाकारांसाठी ही एक पर्वणी असून विविध देशांतून शॉर्ट फिल्मचे सहभाग होत आहेत."

- विधान पवार, प्रसिद्धीप्रमुख बाईस्कोप फेस्टिव्हल

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

SCROLL FOR NEXT