olympic games Sakal Media
क्रीडा

ऑलिंपिक १०० दिवसांवर; मात्र कोरोनाचे ढग चिंताजनक

ऑलिंपिक होणाऱ्या टोकियो शहरातील कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांत झपाट्याने वाढेल अशी भीती व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

टोकियो : एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलेले टोकियो ऑलिंपिक १०० दिवसांवर आले आहे, पण स्पर्धेवरील कोरोनाचे ढग चिंताजनकच झाले आहेत. जपानवासीयांचा स्पर्धेस असलेला विरोध वाढतच आहे. त्यातच भारत आणि ब्राझीलमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे स्पर्धा किती सुरक्षित असेल याची चर्चा सुरू झाली आहे. जपानने ऑलिंपिकचे यजमानपद मिळवले, त्या वेळी आर्थिक प्रश्न नसतील तसेच राजकीय अस्थिरतेची चिंता नसेल. पण हीच स्पर्धा आता सर्वाधिक असुरक्षित मानली जाण्याची शक्यता आहे. ऑलिंपिक होणाऱ्या टोकियो शहरातील कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांत झपाट्याने वाढेल अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोना रोखण्यासाठी जपानने परदेशी चाहत्यांना प्रवेश नाकारला आहे; मात्र अजूनही जपानवासीयांना प्रवेश असणार का याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्पर्धेचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाची परिस्थिती वेगाने बदलत आहे. स्पर्धेच्या वेळी नेमकी काय स्थिती असेल हे सांगता येत नाही, असे संयोजक सांगतात. पाहुण्या क्रीडापटूंनी सुरक्षेचा भंग करू नये; अन्यथा त्यांना स्पर्धा बंदीस सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. टोकियोच्या पश्चिमेस असलेल्या मात्सुयामा शहर प्रशासनानेही ऑलिंपिक ज्योत शहरात सर्वत्र फिरणार नाही असे ठरवले आहे.

उष्णतेचे आव्हान

ऑलिंपिक सुरू होण्याच्या सुमारास जपानमध्ये उष्णतेची लाट येते. जपानमधील अनेकांना या उष्णतेचा त्रास होतो. या उष्णतेचा त्रास होण्याची तसेच कोरोनाची लक्षणे यात फारसा फरक नाही. त्याचबरोबर उष्णता वाढती असताना मास्क लावून रांगेत उभे राहणे सोपे नसते, असे जपानमधील तज्ज्ञ मान्य करतात.

संयोजकांसमोरील आव्हाने

स्पर्धेच्या वेळी असलेल्या वैद्यकीय पथकास कोरोनापासून बचाव करणारा किट असावा का, असल्यास किती लागतील. क्रीडानगरीत १५ हजार क्रीडापटू, मार्गदर्शकांचा मुक्काम. तिथे तसेच स्पर्धेसाठी एकंदर सव्वा लाख स्वयंसेवक आवश्यक. यंत्रणेवर वाढता ताण असताना हे स्वयंसेवक कसे उपलब्ध करणारजपानमधील प्रमुख शहरात आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण, त्यामुळे तेथील कर्मचारी क्रीडापटू, पदाधिकाऱ्यांसाठी उपलब्ध कसे करणार हा प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT