13-year-old bike racer Shreyas Hareesh dies in racing accident 
क्रीडा

Shreyas Hareesh Death : होत्याचं नव्हतं झालं! अवघ्या १३ वर्षांच्या तरुण मुलाचा बाईक रेसिंगमध्ये अपघातात दुर्देवी मृत्यु

दहा दिवसांपुर्वीच श्रेयसचा वाढदिवस झालेला. त्याच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर शोककळा पसरलीय

Kiran Mahanavar

Shreyas Hareesh Death : बेंगळुरूमधील एक दुख:द बातमी समोर आली आहे. शनिवारी येथे रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या अपघातात 13 वर्षीय प्रतिभावान रेसर कोपरम श्रेयस हरीश (Shreyas Hareesh) चा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचवेळी, श्रेयसने नुकताच 10 दिवसांपूर्वी त्याचा 13 वा वाढदिवस साजरा केला होता.

इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे सुरू आहे. मात्र आता अपघातानंतर ही शर्यत आज म्हणजेच रविवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

खरं तर, शनिवारी सकाळीच या शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता स्पर्धेत श्रेयसने चमकदार पहिले स्थान मिळविले होते. शर्यतीत ट्रॅकचे पहिले वळण ओलांडत असताना श्रेयसचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. शर्यत ताबडतोब थांबवण्यात आली आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर त्याला रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेच्या वेळी त्याचे वडीलही त्याच्यासोबत होते. बंगळुरूमधील केनश्री स्कूलचा विद्यार्थी श्रेयसचा जन्म 26 जुलै 2010 रोजी झाला होता. त्याने अनेक मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील शर्यती जिंकल्या होत्या.

पाहिले तर भारतीय मोटरस्पोर्टमधला या वर्षातील हा दुसरा अपघात आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2022 च्या दुसऱ्या फेरीत झालेल्या अपघातानंतर 59 वर्षीय रेसर केई कुमारचा रुग्णालयात मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT