Sourav Ganguly  E SAKAL
क्रीडा

BCCI चा स्थानिक खेळाडूंना दिलासा; IPL पुन्हा देशाबाहेर?

यंदाच्या 14 व्या हंगामात भारतातील मैदानात रंगलेली स्पर्धा मात्र स्थगित करावी लागली आहे.

सुशांत जाधव

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona Pandemic) सलग दुसऱ्या वर्षी क्रीडा क्षेत्रात संकट घोंगावत आहे. मागील वर्षी बऱ्याच स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली होती. या संकटजन्य परिस्थितीत बीसीसीआयने (BCCI) युएईच्या (UAE) मैदानात आयपील स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली. यंदाच्या 14 व्या हंगामात भारतातील मैदानात रंगलेली स्पर्धा मात्र स्थगित करावी लागली आहे. (IPL 2021 Postponed) स्पर्धेतील उर्वरित 31 सामने कोणत्या ठिकाणी होणार हा प्रश्न निर्माण झालाय. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI president Sourav Ganguly) यांनी एका मुलाखतीमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसंदर्भात मोठे वक्तव्य केले असून खेळासाठी आयुष्य झोकून दिलेल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी दिलासा देणारे भाष्य केले.

'स्पोर्टस्टार'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरव गांगुली यांनी कोरोनाजन्य परिस्थितीत बीसीसीआयसमोर असणाऱ्या आव्हानांवर भाष्य केले. कोरोना विषाणूने आपल्या सर्वाच्या आयुष्यासह खेळालाही उद्धस्त केलं आहे. ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होईल, अशी आस बाळगूयात. जून-जुलै दरम्यान सर्व ज्यूनियर खेळाडू, अंपायर्स आणि स्कोरर्सला त्यांची मॅच फी देणार आहोत. कोरोनाच्या संकटात खेळणे ज्यूनियर खेळाडूंसाठी धोकादायक आहे. याचा विचार करुन बीसीसीआयने त्यांना 100 टक्के मानधन देण्याचा विचार केला आहे, असे गांगुलींनी स्पष्ट केले.

16 वर्षांच्या युवा खेळाडूंना आई-वडिलांपासून घराबाहेर एका हॉटेलमध्ये राहणे खूप कठीण आहे. सर्व खेळाडूंसोबत बोलणे शक्य नाही. असोसिएशनच्यावतीने त्यांना प्रोत्साहित करत राहू. यावेळी त्यांना आयपीएलच्या उर्वरित सामन्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आयपीएलचे उर्वरित सामने भारतातच घेतले जातील का? या प्रश्नावर गांगुली यांनी हे शक्य नाही, असे उत्तर दिले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सर्व नियोजनात भारतात क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करणं अशक्य आहे. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे नियोजन कसे करायचे? हा मोठा प्रश्न असून सध्याच्या घडीला यावर ठाम काहीच सांगता येणार नाही, असे गांगुलींनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT