IND_Bachendri_Pal 
क्रीडा

"नो हाईट टू हाय"; माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला झाली ६६ वर्षांची!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवनवीन आव्हान पेलण्याच्या वाटेवर काही महिलांनी पुरुषांच्याही पुढे जाऊन पाऊल टाकल्याची उदाहरणे जगभरात कमी नाहीत. अशा महिलांमध्ये बचेंद्री पाल यांचा देखील समावेश होतो. देशातील पहिल्या महिला पर्वतारोही बचेंद्री पाल यांचा आज जन्मदिवस. वयाच्या बाराव्या वर्षी गिर्यारोहणाला सुरवात केली आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बचेंद्री पाल यांचा जन्म २४ मे १९५४ मध्ये उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावी झाला.

साहसी आव्हानांचा सामना करत, पडेल ती किंमत मोजून ही मोठी आव्हाने पूर्णत्वास पोहचवण्याचा संघर्ष जिद्दीने पूर्ण करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांमध्ये बचेंद्री पाल यांचा समावेश होतो. मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही, तर ती त्या स्वप्नांच्या ही पलीकडे जाऊन यश मिळवतात. देशाच्या पंतप्रधानांसोबत लहान मुलांचा फोटो पाहून, आपल्याला देखील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटायचे स्वप्न उराशी बाळगले. तेव्हा बचेंद्री पाल यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता आपली वाटचाल सुरू ठेवली. आणि २३ मे १९८४ रोजी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.

याही पुढे जाऊन १९९३ साली एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतीय महिला गटाचे सफल नेतृत्व बचेंद्री पाल यांनी केले. यानंतर याच महिला गटातील संतोष यादव हिने एकाच वर्षात दोन वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला. बचेंद्री पाल यांच्या कार्याची दखल घेत १९८६ मध्ये त्यांना खेळातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर १९९४ मध्ये भारत सरकारतर्फे दिला जाणारा साहसी प्रकारातील अॅडव्हेंचर अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.          

लहानपणी जेमतेम वयाच्या बाराव्या वर्षी बचेंद्री पाल यांनी आपल्या गिर्यारोहणाला सुरवात केली होती. शालेय शिक्षण घेत असताना आपल्या दहा सहकाऱ्यांसोबत ४००० मी उंचीवर जाण्याचा प्रयत्न देखील बचेंद्री पाल यांनी केला होता. याशिवाय अचानक एक दिवस शाळेला दांडी मारून फक्त एका वेळचे जेवण आपल्यासोबत घेऊन त्यांनी गिर्यारोहणाला सुरवात केली होती. त्यावेळेस पाणी सोबत नसल्याने बर्फ खाऊनच तहान भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

दुसऱ्या दिवशी घरी परतल्यावर त्यांच्या या कृतीमुळे त्यांना घराच्यांच्या चांगलेच रोषाला सामोरे जावे लागले. अशा या साहसी महिला गिर्यारोहकाला भारत सरकारने १९८४ साली पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ

Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती

Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

लग्न ठरत नाही म्हणून ढसाढसा रडली स्वानंदी, प्रोमो पाहून प्रेक्षक हळहळले "या तिच्या खऱ्या भावना"

VIDEO VIRAL: श्रद्धाने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली... 'हे नखरे सहन करु शकतो का?' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT