IND vs ENG  esakal
क्रीडा

IND vs ENG Explainer : गिलचा फॉर्म, विराटची उणीव की पोपचा दर्जेदार खेळ... भारत नेमका कुठं हरला?

India vs England 1st Test : भारताच्या पहिल्या कसोटीतील पराभवाची पाच कारणे

अनिरुद्ध संकपाळ

India Lost Against England In Home : इंग्लंड संघाने भारतातील पहिल्याच कसोटी सामन्यात आपला बॅझबॉल ब्रँड यशस्वी करून दाखवला. पहिल्या डावात 190 धावांनी पिछाडीवर पडून देखील इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला.

भारताने पहिल्या डावात इंग्लंडला 264 धावात गुंडाळले. त्यानंतर 436 धावा ठोकल्या. सामना तिसऱ्या दिवशीच संपणार असं वाटत असतानाच इंग्लंडने जोरदार पुनरागमन केलं. दोन जीवनदान मिळालेल्या ओपी पोपने 196 धावा ठोकल्या.

त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावांपर्यंत मजल मारली. त्याने आपल्या खेळीत तळातील फलंदाजांसोबत कधी शतकी तर कधी अर्धशतकी भागीदारी रचली. हैदराबाद कसोटीत पहिल्या दोन दिवसातच सामन्यावर पकड निर्माण करणाऱ्या भारतानं तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कुठं माती खाल्ली हे पाहूयात. (5 Reason How India Lost In 1st Test Against England In Hyderabad)

इंग्लंडची शेपूट गुंडाळण्यात अपयश

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं जरी इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावात गुंडाळलं अन् 436 धावा करून 190 धावांची आघाडी घेतली असली तरी भारतीय गोलंदाजांना इंग्लंडची शेपूट गुंडाळ्यात अयश आलं. याच शेपटाने इंग्लंड 7 बाद 155 धावांवर असताना संघाला 246 धावांपर्यंत पोहचवलं. बेन स्टोक्सच्या साथीनं तळातील तीन फलंदाजांनी 91 धावा जोडल्या.

दुसऱ्या डावात देखील शेवटच्या तीन फलंदाजांनी ओली पोप सोबत तब्बल 145 धावा जोडल्या. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दुसऱ्या डावात अतिरिक्त दबाव आला.

धावा रोखण्यात गोलंदाजांना अपयश

भारतीय गोलंदाजांना इंग्लंडची रणनिती फेल ठरवण्यात अपयश आले. इंग्लंडच्या ओली पोपने भारतीय फिरकीसमोर स्विप, रिव्हर्स स्विप आणि स्विच हिटचा खुबीने वापर केला. यामुळे भारतीय फिरकीपटूंची लय बिघडली.

तसेच ज्यावेळी इंग्लंडचे फलंदाज काऊंटर अटॅक करत होतो त्यावेळी त्यांना रोखण्याची रणनिती भारताकडे नव्हती. एकटा जसप्रीत बुमराह रिव्हर्स स्विंग करत होता. मात्र भारतीय फिरकीपटूंना स्लो आणि लो असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करता आलं नाही.

लकी ओलीनं दिला दणका

इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपने दुसऱ्या डावात बेन स्टोक्सचा रोल प्ले केला. त्याने तळातील फलंदाजांना साथीला घेत भागीदारी रचली. त्याने स्विप आणि रिव्हर्स स्विपचा वापर केलाच. त्याचबरोबर त्याने फुटवर्कचा उत्तम वापर करत भारतीय फिरकीपटूंनी जेरीस आणलं.

त्यातच त्याला अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी झेल सोडून हातभार लावला. तर केएल राहुलने चौथ्या दिवशी त्यााच झेल सोडत इंग्लंडला सामन्यावर पकड मिळवून देण्यास मदतच केली. भारतानं खरा सामना तिथंच हरला.

चौथ्या डावात आक्रमक वृत्तीचा अभाव

भारतासमोर इंग्लंडने 231 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारताने नवीन चेंडूवर आक्रमक सुरूवात केली. मात्र रोहित आणि जयस्वाल बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली. पाठोपाठ विकेट पडल्याने भारतीय फलंदाज दबावात आले अन् त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला.

जर केएल राहुल, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाने जरी कॅलक्युलेटिव रिस्क घेतली असती तरी सामना अजून जवळ आणता आला असता. अश्विन आणि केएस भरतने आठव्या विकेटसाठी तशी फलंदाजी करून दाखवली. जर केएल राहुल, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्यात जरी एखादी मोठी भागीदारी झाली असती तरी सामन्याचं चित्र वेगळं असतं.

गिलचा खराब फॉर्म, विराटची उणीव

भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा फेल गेला आहे. कसोटीत तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर मोठी जबाबदारी असते. तो सामन्याचा टोन सेट करत असतो. मात्र गिलला गेल्या काही सामन्यांपासून धावा करण्यात अपयश येत आहेत. त्याने जर दुसऱ्या डावात 20 - 25 धावांचे योगदान जरी दिले असते तरी सामना भारताच्या हातातून निसटला नसता.

चेस करताना विराट कोहली कायम डिलिव्हर करतो. पहिल्या कसोटीत विराट कोहलीची उणीव नक्कीच भासली. विराट कोहली चेस करताना संपूर्ण संघाला आपल्या भोवती घेऊन खेळतो. तो शेवटपर्यंत विकेटवर टिकतो याचबरोबर तो रनरेट देखील ड्रॉप होऊ देत नाही. रोहित अन् यशस्वीच्या जवळपास अर्धशतकी सलामीनंतर सामना पुढे नेण्याचं काम विराट खुबीने करतो. मात्र आज त्याची उणीव भासली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT