क्रीडा

Tokyo Olympic साठी ई-कचऱ्यातून बनवले 5000 ‘मेडल्स'

अक्षता पवार

पुणे : ‘‘जागतिक स्तरावर ‘हवामान बदलाची’ समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातच पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करून जपानने टोकियो ऑलिंपिकचे आयोजन केले आहे. यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्यापासून ते ‘इलेक्ट्रॉनिक वेस्ट’ याचे पुनर्वापर करत ऑलिंपिक्ससाठी लागणाऱ्या साहित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर देशांसाठी हा प्रेरणादायी ठरणार आहे.’’ असे प्रतिपादन पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी यांनी केले.  

‘किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर’ (केव्हीईआर) यांच्या वतीने शनिवारी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘इको फ्रेंडली टोकियो ऑलिंपिक्स’ या विषयावर डॉ. जोशी बोलत होते. या कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, तज्ञ आदींनी सहभाग घेतला होता.

डॉ. जोशी म्हणाले, ‘‘इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विविध गोष्टींच्या पुनर्वापरातून ऑलिंपिक्समध्ये लागणाऱ्या साहित्यांची निर्मिती करण्यात येत आली आहे. ऑलिंपिक्समध्ये खेळा पासून त्याच्या आयोजनात पर्यावरणाचे ही संवर्धन व्हावे यासाठी शासत्रज्ञांच्या गटाने कित्येक महिने अभ्यास केला. त्यातून हा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये हरितगृह वायू आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक खेळानंतर कार्बन उत्सर्जनाची नोंद केली जाणार असून ऑलिंपिक्स संपल्यानंतर याचा अभ्यास केला जाणार आहे. पर्यावरणाबरोबरच पॅरालिंपिक खेळाडूंसाठी ही सोय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.’’

- बांधकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून ऑलिंपिकच्या मशालीची निर्मिती

- खेळाडूंच्‍या येण्या जाण्यासाठी ई- वाहनांचा वापर  

- ऑलिंपिक मशालीसाठी जैविक गॅस ऐवजी हायड्रोजनचा वापर. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य

- सुमारे अडीच टन प्लॅस्टिक कचऱ्यातून विजेत्यांना पदके प्रदान करण्यासाठीच्या ‘पॉडियम’ची निर्मिती

- ऑलिंपिक्ससाठी लागणाऱ्या उपकरणांची खरेदी करण्याऐवजी भाडे तत्त्वावर उपकरणे घेण्यात आले आहेत

- संगणक, टेबल व तर साहित्य वापरानंतर विविध संस्थांना देण्यात येणार

- ऑलिंपिक्ससाठी नवे क्रीडांगणे निर्मित न करता जुन्या क्रिडांगणांचाच वापर

- तसेच क्रीडांगणाच्या परिसरात वृक्षारोपण

- ऑलिंपिक दरम्यान निर्माण झालेल्या कचऱ्याच्या पुनर्वापर

ई-कचऱ्यातून पाच हजार ‘मेडल्स’ची निर्मिती

इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची (ई-कचरा) समस्या ही जागतिक समस्या झाली आहे. मात्र ‘टोकियो मेडल प्रकल्प २०२०’च्या अंतर्गत ई-कचऱ्याचा वापर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांच्या निर्मितीसाठी करण्यात आले आहे. ही या ऑलिंपिक्स मधील आकर्षणाची गोष्ट आहे. यासाठी जपान ऑलिंपिक समितीद्वारे २०१७ ते २०१९ दरम्यान ७८ हजार ९०० हून अधिक टन ई-कचरा संकलित करण्यात आला. या सर्व ई-कचऱ्यातील धातूवर प्रक्रिया करत त्यातून पाच हजार मेडल्सची निर्मिती करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT